Sugarcane  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Bill : पडळ कारखान्याकडून १५१ प्रमाणे बिल जमा

Sugarcane FRP : पडळ (ता. खटाव) येथील खटाव -माण तालुका को- ऑप ॲग्रो प्रा. लिमिटेड या साखर कारखान्याने कामगारांना दहा टक्के दिवाळी बोनस जाहीर केला आहे.

Team Agrowon

Satara News : पडळ (ता. खटाव) येथील खटाव -माण तालुका को- ऑप ॲग्रो प्रा. लिमिटेड या साखर कारखान्याने कामगारांना दहा टक्के दिवाळी बोनस जाहीर केला आहे.

त्याचबरोबर गेल्या गळीत हंगामातील देय असलेला शेवटचा १५१ रुपयांप्रमाणे हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार प्रभाकर घार्गे, मनोज घोरपडे यांनी दिली.

घार्गे म्हणाले, ‘‘दुष्काळी भागात सुरू करण्यात आलेल्या या साखर कारखान्याने अल्पावधीतच साखर उत्पादनात आणि शेतकऱ्यांच्या उसास उच्चांकी दर देण्यात राज्यातील प्रमुख कारखान्यांची बरोबरी साधली आहे.

त्यामुळे दसऱ्या दिवशी झालेल्या बॉयलर प्रदीपन कार्यक्रमात शेतकऱ्यांना वचन दिल्याप्रमाणे गत गळीत हंगामातील उर्वरित रुपये १५१ प्रमाणे बिलांची रक्कम दिवाळीपूर्वी त्यांच्या बँक खात्यात वर्ग केली आहे.

त्यामुळे दिलेले वचन पूर्ण केल्याचे समाधान वाटत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्यामार्फत साखरेचे वाटप सुरू करण्यात आले असून, त्याचाही लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT