Indian Farmer Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer ID : ‘ॲग्रीस्टॅक’अंतर्गत दीड लाख शेतकरी आयडी तयार

Agristack Yojana ।। ॲग्रीस्टॅक अंतर्गत सुरू असलेले जिल्ह्यातील कामकाज समाधानकारक असून याच गतीने उर्वरित शेतकऱ्यांची नोंदणी फार्मर आयडीसाठी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तालुकास्तरीय यंत्रणेला केल्या.

Team Agrowon

Kolhapur News : जिल्ह्यातील ११ लाख ५० हजार शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी काढून देण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील बारा तालुक्यांमधील १ लाख ५१ हजार ९६४ शेतकऱ्यांनी नोंदणी करून फार्मर आयडी काढले आहेत.

ॲग्रीस्टॅक अंतर्गत सुरू असलेले जिल्ह्यातील कामकाज समाधानकारक असून याच गतीने उर्वरित शेतकऱ्यांची नोंदणी फार्मर आयडीसाठी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तालुकास्तरीय यंत्रणेला केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील श्री शाहू सभागृहातून व्हीसीद्वारे त्यांनी तालुका प्रशासनाशी संवाद साधला.

या वेळी उपजिल्हाधिकारी महसूल डॉ. संपत खिलारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगारे, प्रांत अधिकारी हरीश धार्मिक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, तहसीलदार स्वप्नील रावडे, आयुष्यमान भारतचे नोडल डॉ. रोहित तसेच तालुका स्तरावरून उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्ह्यात दीड लाख शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार करून राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे. याच प्रकारे जिल्ह्यात ॲग्रीस्टॅकचे काम सुरू राहिले तर फेब्रुवारीअखेर संपूर्ण जिल्ह्यातील ११ लाख ५० हजार शेतकऱ्यांचे फॉर्म आयडी काढून होतील.

त्यामुळे प्रत्येक गावातील सुरू असलेल्या कॅम्पला गती देऊन सर्व फार्मर आयडी वेळेत पूर्ण होतील यासाठी यशस्वी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी सर्व तालुकास्तरीय यंत्रणेला केल्या. ॲग्रीस्टॅक योजनेमधून फार्मर आयडी तयार करीत असताना प्राधान्याने पंतप्रधान किसान सन्मान योजनेमधील लाभार्थ्यांचेही फार्मर आयडी काढण्याचे निर्देश त्यांनी दिले.

काय आहे ॲग्रीस्टॅक योजना?

या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री), शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांची माहिती संच (क्रॉप सोन रजिस्ट्री) व शेतांचे भू संदर्भिकृत (जिओ रेफरन्स लँड पार्सल) यांचा माहिती संच एकत्रितरीत्या तयार करणे व तो सातत्याने अद्ययावत करणे या बाबी यामध्ये अंतर्भूत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT