Krishi Seva Kendra  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Inputs Seller : परभणी जिल्ह्यात १५ कृषी निविष्ठा केंद्रांचे विक्री परवाने निलंबित

Krishi Seva Kenfra : अनियमितता आढळून आल्यामुळे परभणी जिल्ह्यातील १५ कृषी निविष्ठा विक्री केंद्रांचे बियाणे, खते, कीटकनाशके विक्री परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

Team Agrowon

Parbhani News : अनियमितता आढळून आल्यामुळे परभणी जिल्ह्यातील १५ कृषी निविष्ठा विक्री केंद्रांचे बियाणे, खते, कीटकनाशके विक्री परवाने निलंबित करण्यात आले आहेत. जास्त दराने खत विक्री, रासायनिक खताची साठवणूक करून शेतकऱ्यांची अडवणूक केल्यास तसेच भेसळयुक्त खत विक्री बाबतच्या तक्रारी आढळल्यास भरारी पथकामार्फत मोहीम स्वरूपात कार्यवाही केली जाईल, असा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी दिला आहे.

चालू (२०२५) खरीप हंगामात जिल्हास्तरीय भरारी पथक व निरीक्षकामार्फत अचानक रासायनिक खते, बी-बीयाणे,किटकनाशके विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांची तपासणी करण्यात आली. अनियमितता आढळलेल्या केंद्राची सुनावणी मंगळवारी (ता. ८) घेण्यात आली. अनियमितता करून व त्या बाबतचा अहवाल तसेच पूर्तता सादर न केलेल्या १५ कृषी केंद्राचे बियाणे, खते, कीटकनाशके विक्री परवाने निलंबित करण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे.

त्यात कृषी केंद्राचे नाव व ठिकाण, निविष्ठा प्रकार, (कंसात परवाना निलंबन कालावधी) मे. मैनापुरी कृषी सेवा केंद्र, आडगाव (ता. जिंतूर), बियाणे (१५ दिवस), मे. अंजली फर्टिलायझर, जिंतूर, बियाणे (१५ दिवस), मे. हरी ओम ट्रेडर्स चारठाणा (ता. जिंतूर), बियाणे (१५ दिवस), मे. वैष्णवी कृषी सेवा केंद्र, गंगाखेड, बियाणे (३० दिवस), मे. भगवानबाबा कृषी सेवा केंद्र, गंगाखेड, बियाणे (१५ दिवस), मे. श्रीगणेश कृषी सेवा केंद्र, चारठाणा, (ता. जिंतूर),

बियाणे (७ दिवस), मे. ओंकार कृषी केंद्र, आडगाव (ता. जिंतूर), निविष्ठा प्रकार, रासायनिक खत (१५ दिवस), मे. हरी ओम ट्रेडर्स चारठाणा, (ता. जिंतूर), रासायनिक खत (३० दिवस), मे. भगवानबाबा कृषी सेवा केंद्र, गंगाखेड, रासायनिक खत (१५ दिवस), मे. सारू कृषी केंद्र पूर्णा, रासायनिक खत (३० दिवस),

मे. समर्थ ॲग्रो एजन्सी, पूर्णा, रासायनिक खत (३० दिवस), मे. बाबाराम अप्पा एक्लारे पूर्णा, रासायनिक खत (३० दिवस), मे. श्रीगणेश कृषी सेवा केंद्र, चारठाणा, (ता. जिंतूर), रासायनिक खत (७ दिवस), मे. हरी ओम ट्रेडर्स चारठाणा, (ता. जिंतूर), किटकनाशक (३० दिवस), मे. श्रीगणेश कृषी सेवा केंद्र चारठाणा, (ता. जिंतूर), किटकनाशक (७ दिवस).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lasunghas cultivation: पौष्टिक लसूणघास चारा पिकाचे लागवड तंत्र

Winter Cow Care: हिवाळ्यातील संकरित गाईंच्या आरोग्याचे व्यवस्थापन

Solar Irrigation: वीज नसली तरी द्या पिकांना पाणी; सौर उर्जेवर आधारित सिंचन प्रणाली शेतकऱ्यांसाठी फायद्याची

Rabi Season: जमिनी वाफशाला; रब्बीची तयारी सुरू

India Urea Plant in Russia: रशियात भारताचा पहिला युरिया प्रकल्प, चीनच्या निर्यात निर्बंधांनंतर उचलले मोठे पाऊल

SCROLL FOR NEXT