Maharashtra Election Result 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Election Result 2024 : महायुतीची त्सुनामी! १४६ जागां जिंकल्या, १८९ ठिकाणी आघाडीवर; मविआचा फक्त २८ ठिकाणी विजय

Maharashatra Vidhansabha Election Result 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या त्सुनामीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे अख्या देशाचे लक्ष लागून राहिले होते. यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप नेतृत्वातील महायुतीला मोठे यश मिळाले आहे. तर महायुतीच्या त्सुनामीने महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेते पराभूत झाले आहेत. सध्या महायुती राज्यातील १८९ ठिकाणी आघाडीवर असून मविआ २७ ठिकाणी आघाडीवर आहे. तर इतर १० ठिकाणी अपक्ष आणि इतर उमेदवार आघाडीवर आहेत.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास भाजपचे ७७ उमेदवार विजयी झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ३७ जागांवर विजय मिळाला असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ३२ जागा मिळाल्या आहेत.

सध्या भाजप ५६ जागांवर आघाडीवर असून शिंदे गटाने २० ठिकाणी आघाडी घेतली आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची ९ ठिकाणी घौडदौड सुरू आहे.

तर महाविकास आघाडीतील तिनही पक्षांना कडवी झुंझ देवून ही त्यांना १०० पार करता आलेली नाही. सध्याच्या घडीला मविआतील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना ६, शरद पवार यांची राष्ट्रवादी ४ आणि काँग्रेस ७ ठिकाणी आघाडीवर आहे.

दरम्यान शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) १४ उमेदवार विजयी झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) ६ उमेदवार विजयी झाले आहेत. तर काँग्रेसला फक्त ८ ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा पराभव करणे शक्य झाले आहे.

एकीकडे महायुतीकडून महाविकास आघाडीचा पराभव केला जात असतानाच दुसरीकडे समाजवादी पार्टी (एसपी) ने दोन जागा जिंकल्या आहेत. तसेच जनसुराज्य शक्ती पार्टीने देखील २ जागा जिंकल्या असून १ जागेवर राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टी आघाडीवर आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाने १ जागा जिंकली असून कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (CPI-M) ने १ जागा जिंकली आहे. अपक्ष (इंडिया) एका ठिकाणी जिंकला असून एका ठिकाणी आघाडीवर आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT