Veterinary department  Agrowon
ॲग्रो विशेष

Veterinary Department : पशुसंवर्धन विभागातील १४५ पदे रिक्त

Animal Husbandry Department : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची मंजूर २८६ पैकी तब्बल १४५ पदे रिक्त आहेत. त्यामुळे लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आव्हान पशुसंवर्धन विभागासमोर असून सध्या कार्यरत ५० टक्के कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी स्कीन या त्वचा आजाराचा कहर सुरू असून बाधित जनावरांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र पशुसंवर्धन विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची मंजूर २८६ पैकी तब्बल १४५ पदे रिक्त आहेत. त्यामुळे लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आव्हान पशुसंवर्धन विभागासमोर असून सध्या कार्यरत ५० टक्के कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या लम्पी स्कीनने धुमाकूळ घातला आहे. आजाराची लागण जनावरांना होत असून जनावरे दगावण्याचे प्रमाणदेखील वाढत आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात १५९ जनावरे दगावली.  जनावरांच्या संख्येच्या तुलनेत हा आकडा मोठा आहे. जुलैपासून लम्पी स्कीनने पुन्हा डोके वर काढले असून सध्या लम्पी स्कीनबाधित जनावरांची संख्या ३५५ आहे.

आजार नियत्रंणात आणण्याची जबाबदारी असलेल्या पशुसंवर्धन विभागात सध्या ५० टक्केच अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. राज्य शासन आणि जिल्हा परिषद असे दोन स्वतंत्र पशुसंवर्धन विभाग जिल्ह्यात आहेत. मात्र दोन्ही पशुसंवर्धन विभागांतील सहायक आयुक्त संवर्धन, पशुधन विकास अधिकारी, सहायक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, व्रणोपचारक, परिचर अशी सर्वच पदे रिक्त आहेत. एकूण २८६ पैकी १४५ पदे रिक्त आहेत. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाचा भार ५० टक्के अधिकारी-कर्मचाऱ्यांवर असून लम्पी स्कीन नियंत्रणात ठेवताना या अधिकारी-कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. लसीकरण, लम्पी स्कीनबाधित जनावरांवर उपचार, विविध आजाराने त्रस्त जनावरांवर उपचार सध्या या कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे.  

जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत ही वस्तुस्थिती आहे. यातील काही पदे जिल्हा परिषद तर काही पदे राज्य पशुसंवर्धन विभागात आहेत. अलीकडे रिक्त पदांच्या भरतीबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र असे असले तरी लम्पी स्कीन नियंत्रणासाठी कार्यरत असलेले अधिकारी-कर्मचारी दिवसरात्र काम करीत आहेत.
- डॉ. सुधाकर ठाकूर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, सिंधुदुर्ग
जिल्ह्यात लम्पी स्कीनचा वाढता फैलाव पाहता शासनाने पशुसंवर्धन विभागातील पदे तातडीने भरण्याची गरज आहे. याशिवाय तत्काळ प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
- रणजित तावडे, पशुपालक, वैभववाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Third List: कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर, ३ लाख ५१ हजार १९२ शेतकऱ्यांचा समावेश

Sugar MSP: साखर 'एमएसपी' प्रश्नी दिल्लीतील बैठक निष्फळ, उद्यापासून महाराष्ट्र-कर्नाटकातील महामार्ग रोखणार, राजू शेट्टींचा इशारा

Canal Repair : पहिल्या आवर्तनापूर्वी कालव्यांची दुरुस्ती करा

Solar Irrigation : सातारा जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेुळे उजळणार

Water Tanker Surge : टॅंकरच्या संख्येत झपाट्याने वाढ

SCROLL FOR NEXT