Mulshi Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Pune Monsoon Update : मुळशी धरणक्षेत्रात १४० मिलिमीटर पाऊस

Heavy Rainfall Update: पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या आठवड्यापासून पावसाचा चांगलाच जोर आहे. त्यामुळे धरणांत पाण्याची आवक वाढत आहे. मंगळवारी (ता.१७) सकाळी आठ वाजेपर्यंत मुळशी धरणक्षेत्रात सर्वाधिक १४० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या आठवड्यापासून पावसाचा चांगलाच जोर आहे. त्यामुळे धरणांत पाण्याची आवक वाढत आहे. मंगळवारी (ता.१७) सकाळी आठ वाजेपर्यंत मुळशी धरणक्षेत्रात सर्वाधिक १४० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. मागील चोवीस तासांमध्ये धरणांत ४.५४ टीएमसी नव्याने पाण्याची आवक झाली असून, एकूण ५९.०७ टीएमसी म्हणजेच सुमारे ३० टक्के एवढा पाणीसाठा झाला आहे.

मे महिन्यात जिल्ह्यातील धरणक्षेत्रात मॉन्सूनपूर्व पावसाचा जोर कमी-अधिक होता. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात धरणक्षेत्रात पावसाचा बऱ्यापैकी जोर होता. त्यामुळे ओढे, नाले ओसंडून वाहू लागले होते. यामुळे जिल्ह्यातील २६ धरणांत नव्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे.

३१ मेपर्यंत धरणांत उपयुक्त जवळपास २० टीएमसी पाण्याचा येवा दाखल झाला होता. त्यानंतर पंधरा दिवस पावसाने उघडीप दिली. त्यानंतर पुन्हा मागील चार ते पाच दिवसांपासून अधूनमधून सरी बरसत आहेत. मुळशी धरणक्षेत्रात आत्तापर्यंत ५०३ मिलिमीटर पाऊस झाला. तर, इतर धरणक्षेत्रात तुलनेने कमी पाणीसाठा नोंदवला गेला.

मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये घाटमाथ्यावरही जोरदार पाऊस झाला. यामध्ये लोणावळा घाटमाथ्यावर ११३ मिलिमीटर पाऊस झाला. तर ठोकरवाडी ५९, वळवण ६८, कुंडली ५६, शिरोटा ३३ मिलिमीटर पाऊस झाला. तर येडगाव, वडज, घोड, वीर, नाझरे येथे तुरळक सरी पडल्या असून शेटफळ, विसापूर, उजनी धरणक्षेत्रात पावसाची उघडीप होती.

मंगळवार (ता.१७) सकाळी आठवाजेपर्यंत झालेला धरणनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)

मुळशी १४०, टेमघर ९५, वरसगाव ६१, पानशेत ५२, खडकवासला १९, पवना ७०, कासारसाई ३६, कळमोडी ५१, चासकमान ३५, भामा आसखेड २१, आंध्रा ३७, वडिवळे ५५, गुंजवणी ६८, भाटघर २४, नीरा देवघर ४६, पिंपळगाव जोगे १४, माणिकडोह ३०, डिंभे ३०, चिल्हेवाडी १५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Subsidy: 'रब्बी'साठी स्फुरद, पालाशयुक्त खतांच्या अनुदान रकमेत वाढ; 'डीएपी'ची पिशवी १,३५० रुपयांनाच

Farmer Government Schemes: जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारी योजनांचा लाभ मिळणार, सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Agrowon Diwali Article: ‘कृषिगती’चा इलेक्ट्रिक साथी’

Agrowon Diwali Article: गावकुसातील तरुण ‘क्रिएटर्स’

Soil Mulching: जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी आच्छादन करताना काय काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT