Farmers Loan Waiver Agrowon
ॲग्रो विशेष

Shetkari Karjmafi : १४ लाख ५० हजार शेतकऱ्यांची होणार २ लाखांपर्यंत कर्जमाफी; तेलंगणात शेतकरी कर्जमाफीचा तिसरा टप्पा सुरु 

Farmers Loan Waiver : तेलंगणा सरकारने कर्जमाफीचा तिसरा टप्पा १५ ऑगस्टला सुरु केला. या टप्प्यानुसार आता २ लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाणार आहे.

Anil Jadhao 

Pune News : तेलंगणा सरकारने कर्जमाफीचा तिसरा टप्पा १५ ऑगस्टला सुरु केला. या टप्प्यानुसार आता २ लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाणार आहे. तेलंगणा सरकारने यापुर्वी कर्जमाफीचे २ टप्पे पूर्ण केले. पहिल्या टप्प्यात १ लाखापर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचा समावेश होता तर दुसऱ्या टप्प्यानुसार दीड लाखांपर्यंत कर्ज माफ केले होते. 

काॅंग्रसने तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. सत्तेत आल्यानंतर आश्वासनानुसार कर्जमाफी जाहीर करण्यात आली. तेलंगणात शेतकरी कर्जमाफीसाठी ३१ हजार कोटी रुपये लागणार आहेत. सरकारने पहिल्या दोन टप्प्यात कर्ज माफ केले होते. 

पहिल्या टप्प्यात १ लाखापर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचा समावेश होता तर दुसऱ्या टप्प्यानुसार दीड लाखांपर्यंत कर्ज माफ केले होते. पहिल्या दोन टप्प्यात १२ हजार कोटींची कर्जमाफी करण्यात आली. या दोन्ही टप्प्यांमध्ये राज्यातील १७ लाख ५५ हजार शेतकऱ्यांचे कर्ज सरकारने माफ केले.

तेलंगणाचे मुख्यमंभी ए रेवंथ रेड्डी यांनी १५ ऑगस्टला तिसऱ्या टप्प्यातील कर्जमाफीला सुरुवात केली. तिसऱ्या टप्प्यात राज्यातील १४ लाख ५० हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. तेलंगणाती शेतकऱ्यांना सरकारने कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यात कर्जमाफी केली, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले.

विरोधकांची टिका

सरकारने कर्जमाफी योजनेतून अनेक शेतकऱ्यांना वगळल्याची टिका विरोधी पक्ष भारत राष्ट्र समितीने केली आहे. ``सरकार एकिकडे कर्जमाफीचा डांगोरा पिटत आहे. पण कर्जमाफी जाहीर करून सरकार शेतकऱ्यांना पीककर्जच देत नाही. अनेक शेतकऱ्यांना यंदा खरिपाच्या तोंडावर रयतु बंधु योजनेतून पीक कर्ज दिले नाही``, अशी टिका भारत राष्ट्र समितीचे कार्यकारी अध्यक्ष के.टी.रामाराव यांनी केली. 

भारत राष्ट्र समितीने सरकारने पीक कर्ज नाकारलेल्या शेतकऱ्यांसाठी एक हेल्पलाईन सुरु केली. या हेल्पलाईवर आतापर्यंत ७२ हजार शेतकऱ्यांनी पीककर्ज नाकारल्याच्या तक्रारी केल्या आहेत. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update: माॅन्सून गोव्यात दाखल; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Agriculture Workshop: सघन कापूस लागवडीवर केळीवेळी येथे मार्गदर्शन

Jalyukt Shivar Abhiyan: 'एल निनो'चं संकट; 'जलयुक्त शिवार'साठी १७० कोटी निधी, प्रत्येक जिल्ह्याला मिळणार ५ कोटी

Fertilizer Shop License Suspension: अकोला जिल्ह्यात सात कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द

Fertilizer Complaints Helpline: खतविषयक तक्रार निवारणासाठी तालुकानिहाय हेल्पलाइन सुविधा

SCROLL FOR NEXT