Jal Jeevan Mission Agrowon
ॲग्रो विशेष

Water Bill : नाशिक जिल्ह्यात १४ कोटी पाणीपट्टी थकित

Water Scheme : नांदगाव, दाभाडी व देवळा येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची १३ कोटी ९७ लाख रुपयांची पाणीपट्टी थकित आहे.

Team Agrowon

Nashik News : नांदगाव, दाभाडी व देवळा येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची १३ कोटी ९७ लाख रुपयांची पाणीपट्टी थकित आहे. थकबाकी वसुलीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाने गटविकास अधिकाऱ्यांना स्मरणपत्र देऊन त्वरित कारवाईचे आदेश दिले.

नांदगाव व ५६ खेडी, दाभाडी व १२ गावे, देवळा व नऊ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचे दहा महिन्यांत वसुलीचे प्रमाण हे फक्त २.७५ टक्के राहिले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेला देखभाल व दुरुस्तीचा खर्च, योजनेची वीजबिले, कर्मचारी यांचे वेतन व भत्ते अदा करणे अवघड झाले.

कार्यकारी अभियंता, पाणी व्यवस्थापन देखभाल व दुरुस्ती पथक यांनी दिलेल्या अहवालानुसार गटस्तरावरून पाणीपट्टी वसुलीबाबत कोणतीही ठोस स्वरूपात कार्यवाही करण्यात येत नाही.

योजनेच्या देखभाल व दुरुस्तीचा खर्च तसेच योजनेची वीजबिले, कर्मचारी यांचे वेतन व भत्ते, रसायने, वारंवार उद्‌भवणारी देखभाल दुरुस्ती ही जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या पाणीपट्टीतूनच केली जाते. थकीत पाणीपट्टी मोठ्या प्रमाणात असल्याने योजनेचा खर्च भागविणे जिल्हा परिषद प्रशासनास जिकिरीचे झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT