Mhaisal Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Mhaisal Irrigation : आवर्तनातून सांगलीतील १३० तलाव पाण्याने भरणार

Sangli Water Shortage : सांगली जिल्ह्यातील अनेक भागांत पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे भीषण टंचाईला सामोरे जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

Team Agrowon

Water Supply : सांगली जिल्ह्यातील अनेक भागांत पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे भीषण टंचाईला सामोरे जाण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांचे आवर्तन सुरू आहे.

या आवर्तनामधून टंचाईच्या झळा कमी करण्यासाठी १३० तलाव पाण्याने भरून घेण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २४१ गावांतील पाणी टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यात यंदा वळीव पावसाने दडी मारली. त्यातच वाढती उन्हाची तीव्रता यामुळे भूजल पातळी कमी होत चालली आहे. परिणामी पाणी टंचाई भासू लागली आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत मे, जून, जुलैचा प्रस्ताव दिला असून जुलै ते ऑगस्टदरम्यानचा विशेष कृती आराखडाही तयार करण्यात आला आहे.

त्यानुसार पिण्याच्या पाण्याचे टँकर भरण्यासाठी व तलावाजवळचा उद्‍भव असलेल्या नळ पाणीपुरवठा योजना सुरू राहण्यासाठी जत, मिरज, कवठे महांकाळ, आटपाडी, तासगाव, खानापूर, कडेगावात सिंचनच्या लाभक्षेत्रातील तलावांत पाणी सोडण्यात येणार आहे.

टंचाई स्थितीत सिंचन योजनांचे पाणी लाभक्षेत्रातील तलावांमध्ये सोडण्याबाबत प्रस्ताव सादर करून पिण्यासाठी आरक्षित केले जाते. त्यासाठी उपसा सिंचन योजनेच्या वीजबिलाची तरतूद पाणी टंचाई आराखड्यात करून शासनाकडून अनुदान आल्यानंतर पाटबंधारे विभागाकडे रक्कम वर्ग केली जाते.

त्याप्रमाणे उपसा सिंचन योजनेचे वीजबिल देण्यासाठी २०२२-२३ च्या विशेष कृती आराखड्यात तरतूद करण्यात आली आहे. आता टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून लाभक्षेत्रातील तलावांमध्ये पाणी सोडण्यात येणार आहे. जलसंपदा विभागासोबत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana : लाखावर ‘लाडक्या बहिणी’ लाभापासून राहणार वंचित

e-Peek Pahani : शेतकऱ्यांच्या ई-पीकपाहणीला जळगाव जिल्ह्यात गती

Banana Plantation : उशिराची मृग बहर केळी लागवड सुरू

Rahul Gandhi: बोगस मतदानातून भाजपची सत्ता; निवडणूक आयोगाचे भाजपसोबत संगनमतः राहुल गांधी

Agrowon Podcast: सोयाबीनला मागणी वाढली; मेथीच्या दरात नरमाई, हळद-पपई स्थिर, लसूण भाव स्थिर

SCROLL FOR NEXT