Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Advance Crop Insurance : नांदेड जिल्ह्यात १३० कोटी १० लाखांचा अग्रिम विमावाटप

Crop Insurance Scheme : नांदेड जिल्ह्यात जुलैमध्ये झालेली अतिवृष्टी तसेच ऑगस्टमधील पावसाची अनियमितता यामुळे खरिपातील पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले होते.

Team Agrowon

Nanded News : प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील सर्वच ९६ महसूल मंडळामध्ये सोयबीन पिकासाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती (मिड सीझन ॲडव्हर्सिटी) जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मंजूर केली होती. या घटकानुसार जिल्ह्यात आतापर्यंत १३० कोटी १० लाख रुपयांच्या अग्रिम विमावाटप झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.

नांदेड जिल्ह्यात जुलैमध्ये झालेली अतिवृष्टी तसेच ऑगस्टमधील पावसाची अनियमितता यामुळे खरिपातील पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले होते. अशावेळी जिल्ह्यातील पीक विमाधारक शेतकऱ्यांना पीक नुकसानीच्या २५ टक्के अग्रिम रक्कम मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनास अधिसूचना काढण्याबाबत सूचना शासनाकडून दिल्या होत्या. यानुसार जिल्ह्यामध्ये समितीमार्फत सर्वेक्षण करण्यात आले.

यात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादकतेमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट असल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सोयाबीन कापूस, तूर व खरीप ज्वारी या पिकासाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या घटकाची (मीड सीझन ॲडव्हर्सिटी) अधिसूचना ता. २८ सप्टेंबर रोजी लागू केली होती.

या अधिसूचनेद्वारे जिल्ह्यातील सर्वच ९३ महसूल मंडळातील विमाधारक शेतकऱ्यांना पीक नुकसानीच्या प्रमाणात २५ टक्के रक्कम अग्रिम विहित मुदतीत देण्याचे निर्देश विमा कंपनीला दिले होते.

यानुसार नांदेड जिल्ह्यात २८५ कोटींचा अग्रिम विमा मंजूर झाला आहे, त्यापैकी आतापर्यंत १३० कोटी १० लाखांपेक्षा अधीकची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे, अशी माहिती विमा कंपनी दिली आहे

आधार प्रणालीद्वारे परतावा वाटप

या वर्षी प्रथमच केंद्र शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे आधार प्रणालीद्वारे प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या पोर्टलवरून नुकसान भरपाई रक्कम जमा करण्यात येत आहे. पीकविमा नुकसान भरपाई जमा करण्यास होत असलेल्या विलंबासंबंधी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांमार्फत पाठपुरावा चालू आहे. नुकसान भरपाई जमा करण्यास पोर्टलवरील काही तांत्रिक अडचणीमुळे विलंब होत असून, लवकरच उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल अशी माहिती विमा कंपनीने दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Procurement: केंद्राकडून राज्यात १२ रुपये ३५ पैशानं कांद्याची खरेदी सुरु, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

Banana Cultivation: केळी लागवडीसाठी दर्जेदार कंदांच्या मागणीत वाढ

Khandesh Tur Lagwad: खानदेशात यंदा तूर लागवड स्थिर राहण्याचे संकेत

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

SCROLL FOR NEXT