Animal Husbandry Department Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Husbandry : भोरमध्ये पशुसंवर्धन विभागात १३ रिक्त पदे

Job Vacancies : राज्य पशुसंवर्धन विभागाची १५ पैकी तब्बल १३ पदे रिक्त असल्यामुळे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडे अतिरिक्त भार दिला आहे.

Team Agrowon

Pune News : गेल्या काही वर्षांपासून भोर तालुक्यातील पशुसंवर्धन विभागात रिक्त पदांची संख्या वाढत आहे. राज्य पशुसंवर्धन विभागाची १५ पैकी तब्बल १३ पदे रिक्त असल्यामुळे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडे अतिरिक्त भार दिला आहे. मात्र, तालुक्याची भौगोलिक परिस्थिती आणि पशुधनाच्या संख्येचा विचार करता ही रिक्त पदांची संख्या मोठी आहे. त्यामुळे भोर तालुक्यातील जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आहे.

ही रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी होत आहे. तालुक्यात राज्य पशुसंवर्धन विभागाचे १५ व जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे ११ दवाखाने कार्यरत आहेत. दोन्ही विभाग मिळून सहायक आयुक्त, पशुधन विकास अधिकारी, सहायक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक मिळून एकूण ३३ पदे मंजूर आहेत. मंजूर असलेले सहायक पशुधन विकास अधिकारी पद एक व पशुधन पर्यवेक्षक १२ पदे, अशी १३ पैकी १३ पदे रिक्त आहेत.

सध्या पशुधन विकास अधिकारी ही दोनच पदे कार्यरत आहेत. राज्य शासनाची १३ व जिल्हा परिषदेची ३, अशी १६ पदे रिक्त आहेत. तर मंजूर २५ पैकी शिपायांची १३ पदे रिक्त आहेत. भोर तालुका लघू पशू चिकित्सालयाअंतर्गत येणाऱ्या भोर, राजगड, पुरंदरमधील मंजूर असणाऱ्या २५ पदांपैकी फक्त पशुधन विकास अधिकारी ही दोन पदे कार्यरत आहेत.

रिक्त असलेली पदे

सहायक आयुक्त एक, पशुधन विकास अधिकारी पद भरलेली आहेत. सहा. पशुधन विकास अधिकारी १ पद, पशुधन पर्यवेक्षक १२ ही पदे रिक्त आहेत. शिपाई पदे १२ मंजूर, पण त्यातील ८ पदे रिक्त आहेत. पशुधन पालकांनी आपल्या पशुधनाच्या कानातील बिल्ला मारून त्याची नोंद आपल्या कार्यक्षेत्रातील दवाखान्यातील डॉक्टरांकडून भारत पशुधन अॅपवर नोंद करणे अनिवार्य आहे.

भोर तालुक्यातील पशुधन (२०२० च्या गणनेनुसार)

प्रकार -- संख्या

पक्षी वर्ग -- १२,८८३

गाय वर्ग -- १२,१४०

म्हैस वर्ग -- ८,९९०

शेळी --- ४८८४

मेंढी --- ३,७२०

एकूण --- ४२,६१७

जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागात पशुधन विकास अधिकारी पदाची पाच ही पदे रिक्त आहेत. सहायक पशुधन विकास अधिकारी एक पद मंजूर असून ते भरलेले आहे. पशुधन पर्यवेक्षकांच्या अकरा मंजूर पदांपैकी दोन पदे रिक्त आहेत. तर शिपायाच्या दहा पैकी सहा जागा रिक्त आहेत.
- डॉ. वर्षाराणी जाधव, पशुधन विकास अधिकारी, भोर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT