Agriculture Awards Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Awards : सांगलीतील १३ शेतकऱ्यांची कृषी पुरस्कारांवर मोहोर

Agriculture Awards in Maharashtra : शेतीनिष्ठ, कृषिभूषण, शेतीमित्र, युवा शेतकरी, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ, उद्यानपंडित व जिजामाता कृषिभूषण असे १३ पुरस्कार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाले.

Team Agrowon

Sangli News : शेती आणि शेतीपूरक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. २०२० ते २०२२ या तीन वर्षांच्या विविध पुरस्कारांची घोषणा नुकतीच झाली. शेतीनिष्ठ, कृषिभूषण, शेतीमित्र, युवा शेतकरी, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ, उद्यानपंडित व जिजामाता कृषिभूषण असे १३ पुरस्कार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाले.

राज्य शासनाच्या वतीने कृषी, कृषिसंलग्न क्षेत्र, तसेच फलोत्पादनात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना कृषी पुरस्कार देण्यात येतात. त्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित असे पुरस्कार आहेत.

त्यात २०२२ चे वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी - बसवराज शिवपुत्र (शिवाण्णा) कुंभार (संख, ता. जत), युवा शेतकरी - धैर्यशील रणधीर पाटील (साखराळे, ता. वाळवा), वसंतराव नाईक कृषिभूषण - अमोल आनंदराव लकेसर (दुधारी, ता. वाळवा), २०२१ चे वसंतराव नाईक शेतीनिष्ठ - जयकर राजाराम माने (सावंतपूर, ता. पलूस), उद्यानपंडित - महेंद्र आनंदराव कदम (विटा, ता. खानापूर), जिजामाता कृषिभूषण -सुलोचना मोहन कदम (कुंडलवाडी, ता. वाळवा), वसंतराव नाईक कृषिभूषण, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील, कृषी सेवारत्न असे पुरस्कार आहेत.

त्यात तात्यासाहेब रामचंद्र नागावे (खटाव, ता. पलूस), २०२० चा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी -प्रमोद अण्णासाहेब पाटील (डिग्रज, ता. मिरज), उद्यानपंडित-रूपेश बाळू गायकवाड (शेटफळे, ता. आटपाडी), युवा शेतकरी - किशोर दीपकराव बाबर (गार्डी, ता. खानापूर), वसंतराव नाईक शेतीमित्र - विजय बिरजाप्पा रूपनूर (येळवी, ता. जत),

जिजामाता कृषिभूषण - मधुमती दयाधन सोनवणे (मालगाव, ता. मिरज), वसंतराव नाईक कृषिभूषण - प्रशांत भानुदास पाटील (राडेवाडी-अंकलखोप, ता. पलूस) यांना पुरस्कार जाहीर झाला असून त्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. ऊस, सोयाबीन, केळी, द्राक्ष या पिकात आदर्श काम शेतकऱ्यांनी केले आहे.

मला २०२१ चा कृषिभूषण पुरस्कार मिळाला आहे. काळ्या आईची प्रमाणिक सेवा केल्याचे फळ आहे. आता जबाबदारी वाढली आहे.
तात्यासाहेब नागावे, कृषिभूषण प्राप्त शेतकरी, खटाव
वडिलांनी शेतीचे धडे दिले. प्रगतिशील शेतकऱ्यांकडून शेतीचे मार्गदर्शन घेतले. शेतीत एकीने कष्ट केले. यामुळे उद्यानपंडित पुरस्कार मिळाला आहे. शेतीत काम करण्याची ऊर्जा अजून मिळेल.
रूपेश गायकवाड, उद्यानपंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी, शेटफळे, ता. आटपाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

livestock Vaccination: पशुवैद्यक महाविद्यालयातर्फे इटलापूर येथे पशुधनाचे लसीकरण

Mahareshim Abhiyan: हिंगोलीत महारेशीम अभियानात १२० शेतकऱ्यांची नोंदणी

Watermelon Disease Control: अवकाळीनंतर कलिंगडावर रोगांचा धोका! कसे करावे नियंत्रण?

Sugarcane Production Drops: ऊस पिकाच्या उत्पादनात मोठी घट

Krushi Kumbh Exhibition: ‘कृषी कुंभ’ प्रदर्शनाचे आयोजन नेटके,मात्र शासकीय यंत्रणांची उदासीनता

SCROLL FOR NEXT