Amravati News : गेल्या खरीप हंगामात बाजार समितीला धान्य बाजारातील उलाढालीतून १३.४४ कोटी रुपयांची मिळकत झाली आहे. गतवर्षी बाजारात सोयाबीनची तुलनेने आवक कमी झाली असली तरी या पिकातून बाजार समितीला ६.१२ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. बदललेल्या संचालक मंडळाने शेतकऱ्यांना दिलेल्या सुविधांचा हा परिपाक म्हणता येणार आहे.
गतवर्षी (२०२२-२३) खरीप व रब्बी, या दोन्ही हंगामात येथील बाजार समितीत ३० लाख ४० हजार ८७५ क्विंटलची आवक नोंदविण्यात आली. यामध्ये खरिपातील ज्वारी, सोयाबीन, मूग, उडीद, मका, तूर यांसह बाजरा, चणा, गहू, तीळ, भुईमूग या पिकांचा समावेश आहे.
('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
गत हंगामात सोयाबीन, कापूस, मका, मूग, उडीद या पिकांना अपेक्षित असा भाव मिळाला नाही. पुढे भाव वाढतील, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापूस घरातच ठेवला होता. यंदाच्या खरीप हंगामाच्या प्रारंभी त्यांनी त्यातील काही बाजारात आणला खरा, मात्र त्यांच्या अपेक्षा फळल्या नाहीत.
बाजार समितीला मुख्य मिळकत सोयाबीन, तूर व चण्याच्या उलाढालीतून झाली आहे. गत हंगामात येथील बाजारात १३ लाख ८८ हजार २९२ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. सरासरी ५५१३ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.
सोयाबीनच्या उलाढालीतून बाजार समितीला प्रति शेकडा ८० पैसे या बाजार शुल्कानुसार ६ कोटी १२ लाख २९ हजार २३१ रुपये महसूल प्राप्त झाला. तर तुरीच्या ८.५९ लाख क्विंटलच्या आवकमधून ४ कोटी ५१ लाख रुपये मिळालेत. रब्बी हंगामातील चण्याच्या उलाढालीतून २.५१ कोटींचा महसूल मिळाला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.