Amaravati News : फळपीक विमा हा हवामान आधारित आहे. अमरावती जिल्ह्यात संत्रा फळपिकाकरीता रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र फळपीक विम्यासंदर्भात असलेल्या नुकसानीचा ट्रिगर लागत असतानाही कंपनीकडून विमा भरपाईस टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप आहे. परिणामी, २०२२-२३ या वर्षातील तब्बल १३.९३ कोटी रुपयांची भरपाई मिळायची असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
संत्र्याच्या मृग बहर विम्यासाठी राज्यभर प्रति हेक्टरी चार हजार रुपये विमा हप्ता आकारला जातो. आंबिया बहरासाठी नागपूर जिल्ह्यात विमा हप्ता दर २० हजार, तर अमरावतीसाठी १२ हजार रुपये आहे. विशेष म्हणजे या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमा एकमेकांशी संलग्न आहेत. त्यानंतरही विमा हप्त्यात तफावत कोणत्या कारणावरून आहे. या बाबत आजवर कोणत्याच यंत्रणेकडून खुलासा करण्यात आलेला नाही.
विमा कंपन्या या केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असल्याने त्यांच्याकडून राज्य शासनाच्या आदेशाचे पालन होत नाही. त्यामुळेच त्या स्थानिक प्रशासनाला न जुमानता मनमानी कारभार करतात. जिल्ह्यात १३.९३ कोटी रुपयांचे विमा दावे मंजूर आहे. यामध्ये शासनाने आपला हिस्सा दिला असतानाही कंपनीकडून काही मंडलांत पाऊस झाला नसल्याचे सांगत दावे फेटाळण्यात येत आहेत. परिणामी या कंपन्यांना शासनाने काळ्या यादीमध्ये टाकावे.रूपेश वाळके, तालुका उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अमरावती
मृग बहरासाठी ट्रिगर
कमी पाऊस
पावसाचा खंड
आंबिया बहर ट्रिगर
अवेळी पाऊस
कमी तापमान
अधिक तापमान
गारपीट
विमा दावे नाकारले
रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने अमरावती जिल्ह्याचा आंबिया बहराचा सन २०२२-२३ या वर्षातील ९३.१४ कोटी रुपयांचा परतावा नाकारला आहे. नागपूर जिल्ह्यात सन २०२२-२३ आणि २०२३-२४ या वर्षात मृग आणि २०२२-२३ या वर्षातील आंबिया बहराचे दावे नाकारण्यात आले आहे. भरपाईच मिळत नसल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये विमा योजनेबाबत उदासीनता निर्माण झाली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.