Crop Damage Compensation Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : पिकांच्या नुकसानभरपाईपोटी १२ कोटी ३९ लाखांचा निधी

Heavy Rain Crop Damage : एप्रिल, मेमध्ये झालेला वादळी पाऊस आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे कृष्णा-वारणा नद्यांना आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील १९ हजार २९५ शेतकऱ्यांचे ६ हजार ७८४ हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यात एप्रिल, मेमध्ये झालेला वादळी पाऊस आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे कृष्णा-वारणा नद्यांना आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील १९ हजार २९५ शेतकऱ्यांचे ६ हजार ७८४ हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले. त्याची भरपाई म्हणून शासनाकडून १२ कोटी ३९ लाख ९३ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे.

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे एप्रिल ते जून या कालावधीत ३७१ हेक्टर फळबागांसह उन्हाळी पिकांचे नुकसान झाले होते. याचे पंचनामे करून विभागीय कार्यालयाकडे अहवाल सादर केला होता. या भरपाईसाठी एक कोटी २६ लाख ६८ हजार ३०० रुपयांच्या निधीची शासनाकडे मागणी केली होती.

दरम्यान, जुलैमध्ये संततधार पाऊस सुरू राहिल्याने आणि कृष्णा, वारणा नद्यांच्या पुरामुळे पलूस, मिरज, वाळवा, शिराळा तालुक्यांतील खरीप हंगामातील सोयाबीन, भात, हळद, भुईमूग पिकांचे नुकसान झाले.

या चार तालुक्यांतील १८ हजार ३०६ शेतकऱ्यांची ६४१३ हेक्टरवरील पिके बाधित झाली. त्यासाठी ११ कोटी १३ लाख २५ हजार रुपयांच्या निधीची मागणी केली होती. तो मंजूर झाला. दरम्यान, सप्टेंबरमध्येही अतिपावसाचा फटका खरिपातील पिकांना बसला आहे.

५ हजार १३५ शेतकऱ्यांचे २ हजार ५३९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या बाधित पिकांचे पंचनामेही केले आहेत. या शेतकऱ्यांच्या भरपाईसाठी शासनाकडून २ कोटी १७ लाख ६७ हजार रुपये निधीची गरज आहे. त्याला मंजुरी मिळून भरपाईसाठी आता नवीन सरकार येण्याची वाट पाहावी लागेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT