Sugarcane Crushing Maharashtra agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing Maharashtra : राज्यात ११७ लाख टन उसाचे गाळप पूर्ण, हंगाम संथ गतीने

Maharashtra Sugarcane Rate : महाराष्ट्रात १ नोव्हेंबरपासून ऊस गाळप हंगाम चालू करण्याचे आवाहन राज्य सरकारकडून देण्यात आले होते.

sandeep Shirguppe

Sugarcane News : महाराष्ट्रात १ नोव्हेंबरपासून ऊस गाळप हंगाम चालू करण्याचे आवाहन राज्य सरकारकडून देण्यात आले होते. दरम्यान कोल्हापूर, सांगली आणि नागपूर विभागात म्हणावा तसा गाळप हंगाम जोर धरलेला नसला तरी राज्यात मात्र जोरदार गाळप झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.

२३ नोव्हेंबर २०२३ अखेर ११६ लाख ९३ हजार टन उसाचे गाळप पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. सरासरी ७.६६ टक्के सरासरी उताऱ्यानुसार ८९ लाख ५६ हजार क्विंटल इतके साखरेचे उत्पादन झाले आहे.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यातील संघर्षामुळे गाळप हंगाम लांबणीवर गेला. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना एफआरपीपेक्षा जादा रक्कम मिळाली आहे तर सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांबाबत तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक उसाचे उत्पादन घेत असते. यामुळे गळीत हंगाम उशिरा सुरू झाल्याने गाळप कमी दिसत आहे.

महाराष्ट्राच सध्या ७९ सहकारी व ८२ खासगी साखर कारखाने आहेत. यामध्ये १६१ कारखान्यांकडून साखर उत्पादन सुरू झाल्याची माहिती आयुक्तालयातून देण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलन सुरू असल्याने गळीत हंगाम संथ सुरू होता. यावर आता तोडगा निघाल्याने कोल्हापूर जिल्ह्यात मागील ऊसदराबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलेल्या प्रस्तावाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याने गळीत हंगाम वेग लागणार आहे.

तसेच उर्वरित विभागात ऊस गाळपाने आता वेग घेतलेला आहे. चालू वर्ष २०२३-२४ च्या हंगामात दुष्काळी स्थिती असल्यामुळे कार्यक्षेत्रातील ऊस गाळप प्राधान्याने पूर्ण करण्याकडे कारखान्यांचा कल अधिक आहे. त्यादृष्टीने ऊस तोडणी टोळ्यांचे नियोजन करून काम सुरू झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पुढील आठवड्यापासून ऊस गाळपाचा वेग आणखी वाढण्याचा अंदाज आहे.

गतवर्ष २०२२-२३ च्या हंगामात २३ नोव्हेंबर अखेर १८३ कारखाने सुरू होते. त्यांनी १७५ लाख १६ हजा टनाइतके ऊस गाळप पूर्ण केल होते तर ८.४५ टक्के सरास उताऱ्यानुसार १४८.०९ लाख क्विंट इतके साखर उत्पादन झाले होते. याच तुलनात्मक विचार करता चालूव ऊस गाळप संथ गतीने सुरू असल्या चित्र आहे.

२३ नोव्हेंबर अखेर प्राप्त आकडेवारीनुसार राज्यात पुणे विभाग ऊस गाळप व साखर उत्पादनामध्ये आघाडीवर आहे. पुणे विभागात २५२६ लाख ६७ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून, सरासरी ८.०५ उताऱ्यासह २१ लाख ४८ हजार साखरेचे उत्पादन झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT