Gokul Milk Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Gokul Doodh Sangh : ‘गोकुळ’कडून दूध उत्पादकांना ११३ कोटींचा दिवाळी फरक

Diwali Bonus : ‘‘कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे (गोकुळ) म्हैस व गाय अंतिम दूध दर फरकापोटी ११३ कोटी ६६ लाख रुपयांची रक्कम प्राथमिक दूध संस्थांच्या बँकेतील खात्यावर शुक्रवारी (ता. ११) जमा करण्यात येणार आहे.

Team Agrowon

Kolhapur News : ‘‘कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे (गोकुळ) म्हैस व गाय अंतिम दूध दर फरकापोटी ११३ कोटी ६६ लाख रुपयांची रक्कम प्राथमिक दूध संस्थांच्या बँकेतील खात्यावर शुक्रवारी (ता. ११) जमा करण्यात येणार आहे.

ही ‘गोकुळ’च्या लाखो दूध उत्पादकांना दिलेली दीपावली भेट आहे,” अशी माहिती ‘गोकुळ’चे चेअरमन अरुण डोंगळे यांनी दिली. डोंगळे म्हणाले, की गेल्या आर्थिक वर्षात दूधपुरवठा केलेल्या म्हशीच्या दुधास सरासरी प्रतिलिटर २ रुपये ५० पैसे व गायीच्या दुधास सरासरी प्रतिलिटर १ रुपये ५० पैसे याप्रमाणे दूध संस्थांना अंतिम दूध दर फरक देण्यात येणार आहे.

यापैकी प्रतिलिटर ०.२५ पैसेप्रमाणे प्राथमिक दूध संस्थांच्या नावावर डिबेंचरसाठी गोकुळकडे जमा करण्यात येणार आहेत. दूध उत्पादकांना निव्वळ प्रतिलिटर म्हैस दुधास २ रुपये २५ पैसे व गाय दुधास प्रतिलिटर १ रुपये २५ पैसे अंतिम दूध दर फरक देण्यात आला आहे.

यावर्षी संघाने म्हशीच्या दुधाकरिता ५८ कोटी ६१ लाख ५८ हजार रुपये तर गायीच्या दुधाकरिता ३४ कोटी ७० लाख ९३ हजार रुपये इतका दूध दर फरक व दर फरकावर ६ टक्के प्रमाणे होणारे व्याज ३ कोटी २० लाख ३५ हजार व डिंबेचर व्याज ७.७० टक्के प्रमाणे ८ कोटी ९६ लाख ६६ हजार रुपये व शेअर्स भांडवलावर ११ टक्के प्रमाणे लाभांश ८ कोटी १६ लाख ८९ हजार रुपये असे एकूण ११३ कोटी ६६ लाख रुपये इतकी रक्कम स्वतंत्र दूध बिलातून दूध संस्थांच्या खात्यावर बँकेत जमा केली जाणार आहे.

या दर फरकाचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच सीमा भागातील ‘गोकुळ’च्या ७,९२७ दूध संस्थांच्या सुमारे ५ लाख ५० हजार दूध उत्पादक सभासदांना होणार आहे. दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या एकूण ११३ कोटी ६६ लाख रुपये अंतिम दूध दर फरकाव्यतिरिक्त गोकुळने या आर्थिक वर्षामध्ये जवळजवळ ४२ कोटी रुपये पशुवैद्यकीय उपचार, कृत्रिम रेतन, वैरण विकास, मायक्रोट्रेनिंग, दूध संस्था इमारत बांधकाम अनुदान, मिल्को टेस्टर खरेदी, कॉम्प्युटर खरेदी, शैक्षणिक सहल, दूध उत्पादकांना किसान विमा पॉलिसी, भविष्य कल्याण निधी, जातिवंत म्हैस खरेदी अनुदान व वासरू संगोपनावरील अनुदान व सेवासुविधांवर खर्च केले आहेत, असे डोंगळे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain In Maharashtra: राज्यात मुसळधार पावसाचा शेती पिकांना फटका; गावांमध्ये शिरले पाणी, बचावकार्य सुरु

Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Election Commission: निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना इशारा; तर विरोधकांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोगाचा विचार

Heavy Rain : जोरदार पावसाने पश्चिम विदर्भात धुमाकूळ

India Security: आस समृद्धी अन् सुरक्षेची!

SCROLL FOR NEXT