Sugar Factories Maharashtra agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Factories Maharashtra : राज्यातील ४१ साखर कारखान्यांना ११२ कोटी; महावितरणकडून वीज विक्रीचे अनुदान

Sugar Factories Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील शरद सहकारी साखर कारखाना, शाहू सहकारी साखर कारखाना, बिद्री सहकारी साखर कारखाना, जवाहर साखर कारखाना, रेणुका शुगर यांचा समावेश आहे.

sandeep Shirguppe

Maharashtra Sugar Factories : महाराष्ट्र राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांच्या बगॅस आधारित सहवीजनिर्मिती प्रकल्पांकडून गाळप हंगाम २०२३-२४ मध्ये महावितरणला विजेची विक्री करण्यात आली होती. या विक्री केलेल्या विजेसाठी प्रतियुनिट १ रुपये ५० पैसेप्रमाणे ११२ कोटी १० लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. यामध्ये राज्यातील ४१ व कोल्हापूर जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शरद सहकारी साखर कारखाना नरंदे, शाहू सहकारी साखर कारखाना कागल, बिद्री सहकारी साखर कारखाना कागल, जवाहर साखर कारखाना, रेणुका शुगर इचलकरंजी अशा ६ साखर कारखान्यांचा समावेश आहे.

साखर कारखान्यांच्या बगॅस आधारित सहवीज प्रकल्पाकडून महावितरण कंपनीला वीज निर्यात केली जाते. निर्यात विजेला प्रति युनिट १ रूपये ५० पैसे अनुदान एक वर्षासाठी देण्यास मार्च २०२४ मध्ये मान्यता दिली आहे. त्यानुसार साखर आयुक्त पुणे यांनी अटी व शर्तीच्या अनुषंगाने प्रस्तावांची छाननी करून ४१ कारखान्यांचे प्रस्ताव सादर केले होते. त्या प्रस्तावित सर्व साखर कारखान्यांना अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

राज्यातील ४१ साखर कारखान्यांच्या सहवीज प्रकल्पांची ७०२.७ मेगावॅट कार्यान्वित क्षमता असून, या कारखान्यांनी सन २०२३-२४ च्या गाळप हंगामात १ अब्ज ७४ कोटी ३९ लाख १५ हजार ८३ युनिट वीजनिर्मिती केली आहे. तर या हंगामात महावितरणला ९३ कोटी १५ लाख ७९ हजार ९८२ युनिट वीज निर्यात केली आहे. त्यानुसार ११२ कोटी १० लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील अनुदानपात्र कारखाने व अनुदान रक्कम

शरद सहकारी साखर कारखाना, नरंदे : १ कोटी ४२ लाख

शाहू सहकारी साखर कारखाना, कागल : २ कोटी ३१ लाख

बिद्री सहकारी साखर कारखाना : १ कोटी ४४ लाख

जवाहर साखर कारखाना फेज १ : १ कोटी ९३ लाख

जवाहर साखर कारखाना फेज १ : ३१ लाख

रेणुका शुगर इचलकरंजी : ५ कोटी २१ लाख

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT