Sangli Bedena Market agrowon
ॲग्रो विशेष

Sangli Bedena Market : सांगलीत ११० टन बेदाण्याची आवक, मुहूर्ताच्या सौद्याला उच्चांकी दर

Sangli Tasgaon Bedana : नव्या बेदाण्याच्या मुहूर्ताच्या सौद्यात हिरव्या बेदाण्याला २११ रुपये किलो असा दर मिळाला.

sandeep Shirguppe

Sangli Tasgaon Market Yard : तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात यंदाच्या वर्षातील बेदाण्याची उच्चांकी ११० टन आवक झाली. नव्या बेदाण्याच्या मुहूर्ताच्या सौद्यात हिरव्या बेदाण्याला २११ रुपये किलो असा दर मिळाला.

जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, सभापती युवराज पाटील, सहायक निबंधक रंजना बारहत्ते यांच्या हस्ते बेदाणा सौदे काढण्यात आले.

तासगाव बेदाणा बाजारपेठेत कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात नव्या बेदाण्याची आवक झाली. बाजारात ११० टन हिरवा बेदाणा आवक झाली. निघालेल्या सौद्यात जानसी ट्रेडिंग कंपनी यांच्याकडे आमसिद्ध शिवप्पा सोरडी रा. घोनसगी जी विजापूर यांच्या बेदाण्याला २११ रुपये किलो असा दर मिळाला. या हंगामातील हा सर्वाधिक दर मिळाला आहे.

भूपाल पाटील यांच्या धारेश्वर ट्रेडिंग कंपनी या दुकानात लिंगाप्पा सोमलिंग उमराणी रा. जकादबोबलाद (ता. जत) यांच्या बेदाण्याला २०१ रुपये किलो, सतीश माळी यांच्या सतीश ट्रेडिंग कंपनी या दुकानात निघालेल्या नव्या बेदाण्याच्या सौद्यात बसाप्पा शिगोंडी माशाळ रा. बाबानगर, विजापूर यांच्या हिरव्या बेदाण्याला १५१ रू किलो असा दर मिळाला.

राहुल बाफना यांनी तो खरेदी केला. पहिला मुहूर्ताचा सौदा सतीश ट्रेडिंग कंपनी या दुकानात निघाला. या दुकानात ५१टन आवक झाली. यावेळी बाजार समितीचे उपसभापती रामचंद्र जाधव, सचिव चंद्रकांत सूर्यवंशी संचालक रवींद्र पाटील, खंडू पवार अनिल पाटील, अंकुश माळी, सुदाम माळी, कुमार शेटे.

बेदाणा व्यापारी मनोज मालू, केतन सुचक, राम माळी, सुभाष हिंगमिरे, संजय बोथरा, सुशील हडदरे, राहुल मालू, बबलू पाटील, किरण बोडके जगन्नाथ घनेरे, ओंकार सूर्यवंशी, सहायक सचिव चंद्रकात कणसे उपस्थित होते. आज दिवसभर झालेल्या बेदाणा सौद्या मधे हिरवा बेदाणा ९० ते २११, पिवळा बेदाणा ८७ ते १७५ असा सरासरी दर मिळाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT