Latur News : मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड या पाचही जिल्ह्यांत यंदाच्या रब्बी हंगामासाठी हेक्टरी ११ क्विंटल ज्वारीची उत्पादकता प्रस्तावित करण्यात आली आहे. यंदाच्या रब्बी हंगामासाठी लातूर विभागातील पाच जिल्ह्यांत १६ लाख ९५ हजार ५३९ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे.
त्यामध्ये लातूर जिल्ह्यातील ३ लाख ५२ हजार ९५० हेक्टर, धाराशिवमधील ४ लाख ९० हजार ७०३ हेक्टर, नांदेडमधील ३ लाख ८५ हजार २५६ हेक्टर, परभणीमधील २ लाख ८७ हजार २७० हेक्टर, हिंगोलीतील १ लाख ७९ हजार ४३० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.
प्रस्तावित करण्यात आलेल्या १६ लाख ९५ हजार ५३९ हेक्टर क्षेत्रामध्ये रब्बी ज्वारीचे ३ लाख ३९ हजार ७५८ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून त्याची उत्पादकता ११ क्विंटल हेक्टरी प्रस्तावित करण्यात आली आहे.
गव्हाचे १ लाख ५२ हजार २०२ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून हेक्टरी १७ क्विंटल गव्हाचे उत्पादन प्रस्तावित करण्यात आले आहे.
मक्याचे क्षेत्र २० हजार ४३८ हेक्टर प्रस्तावित करण्यात आले असून हेक्टरी २२ क्विंटल मका उत्पादन प्रस्तावित करण्यात आले आहे. हरभऱ्याचे ११ लाख २८ हजार ११८ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. हरभऱ्याची हेक्टरी १२ क्विंटल उत्पादकता प्रस्तावित करण्यात आली आहे.
करडईचे २८ हजार ७८० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले असून हेक्टरी ८ क्विंटल उत्पादकता प्रस्तावित करण्यात आली आहे. जवसाचे २७८ हेक्टर क्षेत्र प्रस्तावि असून हेक्टरी २ क्विंटल १० किलो उत्पादकता प्रस्तावित करण्यात आली असल्याचे कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.