Tur Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Procurement : छत्रपती संभाजीनगरमधील ११ तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची नोंदणी

Tur Market : जिल्ह्यात तूर खरेदीसाठी कार्यान्वित कऱण्यात आलेल्या केंद्रामध्ये छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, वैजापूर, खुलताबाद, कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, पाचोड, शिवना, विहामांडवा या ११ तूर खरेदी केंद्राचा समावेश आहे.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : जिल्ह्यात आधारभूत दरानुसार तुर खरेदीसाठी ११ खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य सहकार पणन महासंघ व राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) मार्फत सुरू करण्यात आलेल्या या केंद्रावरून आतापर्यंत १५० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

जिल्ह्यात तूर खरेदीसाठी कार्यान्वित कऱण्यात आलेल्या केंद्रामध्ये छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, वैजापूर, खुलताबाद, कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, पाचोड, शिवना, विहामांडवा या ११ तूर खरेदी केंद्राचा समावेश आहे.

तूर खरेदीकरिता शेतकरी नोंदणी २४ जानेवारीपासून करण्यात आली. प्रत्यक्षात तूर खरेदी १३ फेब्रुवारीपासून सुरु झाली. खरेदी १३ मेपर्यंत सुरु राहणार आहे. अजूनही म्हणावा तसा प्रतिसाद तूर खरेदीला दिसत नसल्याची स्थिती आहे.

आधारभूत किमतीने खरेदी व बाजार दरात अंतर कमी असल्याने नोंदणी व खरेदीकडे शेतकऱ्यांचा कल फारसा नसल्याची स्थिती आहे. जिल्ह्यातील एकूण केंद्रांपैकी गंगापूरच्या केंद्रावरून आतापर्यंत ४० क्विंटल आधारभूत किमतीने तुरीची खरेदी झाली असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी विजय राठोड यांनी दिली.

जालन्यात १५ केंद्रावर ८५० नोंदणी

जालना जिल्ह्यात महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून सुमारे १५ केंद्र तूर खरेदीसाठी सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रावरून आधारभूत किमतीने तूर खरेदीसाठी आतापर्यंत ८५० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

नोंदणी केली असली तरी खरेदीला मात्र प्रतिसाद मिळाला नसल्याची स्थिती आहे. विविध केंद्रावरून आधारभूत किमतीने खरेदी करण्यात आलेल्या सोयाबीनच्या गोडाऊन मध्ये साठवणुकीचे काम पूर्ण झाले असल्याचेही श्री. राठोड यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT