Voting Update Agrowon
ॲग्रो विशेष

Loksabha Election 2024 : सातारा जिल्ह्यात घरातून करणार १०२२ जण मतदान

Election Voting Update : दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी निवडणूक आयोगाने घरातूनच मतदान करण्याची व्यवस्था केली आहे. सातारा जिल्ह्यात आतापर्यंत १०२२ जणांनी नोंदणी केली आहे.

Team Agrowon

Satara News : दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी निवडणूक आयोगाने घरातूनच मतदान करण्याची व्यवस्था केली आहे. सातारा जिल्ह्यात आतापर्यंत १०२२ जणांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात २५ लाख ६३ लाख ५५२ मतदार संख्या आहे. ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग असलेल्या १८५ जणांनी परवानगी मागितली आहे.

जिल्ह्यात २५ लाख ६३ हजार ५५२ मतदार असून, यामध्ये १३ लाख चार हजार ८३६ पुरुष, तर १२ लाख ५८ हजार ६२२ स्त्री मतदार तर ९४ तृतीयपंथी मतदार आहेत. ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग असलेले १४ हजार ५०७ दिव्यांग मतदार आहेत. तसेच ८० ते ८९ वर्षावरील ४७ हजार ०२१ तर ९० ते ९९ वर्षावरील आठ हजार ७००, शंभर ते १०९ वर्षावरील ९३५, ११० ते ११९ वर्षावरील दोन मतदार आहेत. १२० वर्षाचे दोन मतदार आहेत.

यावेळेस निवडणूक आयोगाने दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांना घरातून मतदान करण्याची मुभा दिली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात चार मे रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. यासाठी घरातून मतदान करण्यासाठी ८५ वर्षांपुढील तब्बल १०२२ जणांनी परवानगी मागितली आहे. ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग असलेल्या १८५ जणांनी घरातून मतदानासाठी परवानगी मागितली आहे.

तसेच जे लोक टपाल कार्यालय, रेल्वे, महावितरण, अग्निशमन सेवा अशा आपत्कालीन व तातडीने सेवांमध्ये आहेत. त्यांनाही पोस्टलच्या माध्यमातून घरातून मतदान करण्याची मुभा असून, त्यांना परवानगी घेण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. सध्या विधानसभा मतदारसंघनिहाय घरातून मतदान करण्यासाठीचा अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. ही प्रक्रिया ३० एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे किती मतदारांनी गृहमतदाराचा पर्याय निवडतात हे समजणार आहे.

...असे होते गृह मतदान

ज्या मतदारांनी घरातून मतदान करण्याचा पर्याय निवडला आहे. त्यांची यादी तयार केली जाते. मतदानाला आठ दिवस शिल्लक असताना अशी यादी करण्याची प्रक्रिया सुरू होते. पोलिंग पथक संबंधित मतदाराच्या घरी पोहोचते. पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून अत्यंत गोपनीय पद्धतीने ही प्रक्रिया पार पाडली जाते. संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण केले जाते.

...यांनी मागितली परवानगी

मतदार संघनिहाय परवानगी मागितलेल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या अशी आहे. सातारा १०७, कोरेगाव ९३, वाई ७४, पाटण २२५, कऱ्हाड उत्तर २६६, कऱ्हाड दक्षिण २५७. परवानगी मागितलेल्या दिव्यांगांची संख्या अशी सातारा २०, कोरेगाव २६,वाई १८, पाटण ५३, कऱ्हाड उत्तर ३२, कऱ्हाड दक्षिण ३६.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT