Jaltara Project Agrowon
ॲग्रो विशेष

Jaltara Project : कोंढाळा झामरे गावात होणार एक हजार ‘जलतारा’

Water Conservation : पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी जिल्ह्यातील कोंढाळा झामरे गावात जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने ‘जलतारा’ (शोषखड्डा) हा अभिनव उपक्रम राबवला जाणार आहे.

Team Agrowon

Washim News : पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी जिल्ह्यातील कोंढाळा झामरे गावात जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने ‘जलतारा’ (शोषखड्डा) हा अभिनव उपक्रम राबवला जाणार आहे. जिल्हाधिकारी बुवनेश्‍वरी एस. यांच्या हस्ते याला प्रारंभ करण्यात आला.

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जलतारा अभियानाची सुरुवात करण्यात आली. या वेळी विभागीय वन अधिकारी अभिजित वायकोस, अप्पर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा, प्रकल्प संचालक आत्मा अनिसा महाबळे, जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब दराडे, तालुका कृषी अधिकारी अतुल जावळे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे, सरपंच शिल्पाताई वाठोरे यांची उपस्थिती होती.

या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी वाढीच्या विविध अवस्थेत असलेल्या चीयासीड पिकाच्या पाहणी केली. या गावात सुमारे १५० हेक्टरवर चियासीडची लागवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच या पिकाच्या उत्पादन वाढीकरिता महत्त्वाच्या बाबी लक्षात घेऊन त्यावर भर देण्यास सांगितले. याची गुणवत्ता राखण्यासाठी यामधील मोहरी पिकाचे निर्मूलन करण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

गुणवत्तापूर्ण चिया सीड्सची निर्मिती करून आपल्या जिल्ह्याची ओळख निर्माण करावी असेही त्या म्हणाल्या. कांदा बीजोत्पादन, फलोत्पादन, मधुमक्षिका पालन व शेतीपूरक उद्योगातून उन्नती साधण्याच्या दृष्टीने शेतमाल प्रक्रिया, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग, यावर भर दिल्यास शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे अर्थार्जन होईल, असेही त्यांनी सांगितले. सुरुवातीला आरिफ शहा यांनी चिया पिकाच्या जिल्ह्यातील वाटचालीबाबत माहिती दिली. प्रास्ताविक महादेव सोळंके यांनी केले तर जयप्रकाश लव्हाळे यांनी आभार मानले.

काय आहे जलतारा प्रकल्प

कोंढाळा झामरे या गावात एक हजार जलतारा केल्या जाणार आहेत. जलतारा म्हणजे शोषखड्डा आहे. पाच बाय सहा फूट आकाराचा हा खड्डा असेल. त्यात दडग, विटांचा भरणा करून पाणी जिरवले जाईल. एका एकरात एक या प्रमाणे एक हजार एकरांवर हे जलतारा केले जातील. यामुळे पाणी मुरेल शिवाय सखल भागात होणारे पीक नुकसान टळेल, असा विश्‍वास प्रशासनाकडून व्यक्त केल्या जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT