Sericulture farming Agrowon
ॲग्रो विशेष

Sericulture : नांदेडमध्ये रेशीम शेतीसाठी एक हजार एकराचे उद्दिष्ट

Silk Farming : रेशीम संचालनालयाच्या वतीने नांदेड जिल्ह्यात सन २०२३-२४ करिता रेशीम शेतीला चालना देण्यासाठी एक हजार एकराचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

Team Agrowon

Nanded News : रेशीम संचालनालयाच्या वतीने नांदेड जिल्ह्यात सन २०२३-२४ करिता रेशीम शेतीला चालना देण्यासाठी एक हजार एकराचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

या वेळी कृषी विभागाला चारशे एकर, जिल्हा परिषद विभागाला तीनशे, तर रेशीम विभागाला तीनशे एकर असे एकूण एक हजार हेक्टरवर तुती लावगडी उद्दिष्ट देण्यात आल्याची माहिती रेशीम विकास अधिकारी नृसिंह बावगे यांनी दिली.

जिल्ह्यात यापूर्वी केवळ रेशीम विकास कार्यालयालाच रेशीम लागवडीबाबत प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकारी होते. परंतु यात शासनाने बदल करून यापुढे कृषी विभाग तसेच जिल्हा परिषदेलाही अधिकारी देऊन त्यांना लागवडीबाबत उद्दिष्टे देण्यात आली आहेत.

सन २०२३-२०२४ या वर्षासाठी नवीन आदेश काढून शासनाने रेशीम लागवडीच्या प्रशासकीय मान्यतेचा अधिकार आता कृषी विभाग, तसेच जिल्हा परिषद प्रशासनाला बहाल केला आहे.

यामुळे शेतकऱ्यांचा वेळ तसेच खर्च वाचून लागवडी वाढतील, असा विश्‍वास व्यक्त होत आहे. आगामी हंगामाची पूर्वतयारी, तसेच प्रचार-प्रसिद्धीसाठी रेशीम विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने लवकरच महारेशीम अभियान राबविण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा सरी शक्य; उन्हाचा चटका कायम

Ratoon Sugarcane: खोडवा उसावरील एल निनोच्या उष्णतेचा ताण कसा कमी करावा?

Farmers Protest: शेतकरी अडचणीत, ऊस दर, धान खरेदी प्रश्नी राकेश टिकेत आक्रमक, मोठ्या आंदोलनाचा इशारा

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT