Solar Project Electricity agrowon
ॲग्रो विशेष

Solar Electricity : सांगलीतील झुरेवाडी, निमसोडला सौरऊर्जेद्वारे १०० टक्के वीजपुरवठा

Solar Energy : प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांना शंभर टक्के सौर ऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्याची योजना ‘महावितरण’ने तयार केली आहे.

Team Agrowon

Sangli News : प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांना शंभर टक्के सौर ऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्याची योजना ‘महावितरण’ने तयार केली आहे. निवड झालेल्या गावांना दोन महिन्यांत सौर ऊर्जेद्वारे शंभर टक्के वीजपुरवठा करण्यात येणार आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील झुरेवाडी, निमसोडचा समावेश आहे.

निवड झालेल्या गावांत पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत घरगुती ग्राहकांना ३ किलोवॉटपर्यंत ७८ हजार रुपयांची सबसिडी देण्यात येणार असून पाणीपुरवठा व दिवाबत्ती योजनांच्या सौर ऊर्जीकरणासाठी शासकीय निधीतून पैसे उपलब्ध करण्यात येणार आहे.

या गावातील सर्व वाणिज्यिक व औद्यगिक ग्राहकांना या योजनेत सहभागी होण्यासाठी आवाहन महावितरणने केले आहे. पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेत निवासी घरगुती ग्राहकांसाठी प्रतिकिलोवॉट ३० हजार रुपये अनुदान दोन किलोवॉटपर्यंत मिळते.

तीन किलोवॉटपर्यंत अतिरिक्त एक किलोवॉट क्षमतेसाठी १८ हजार अनुदान मिळते. तीन किलोवॉटपेक्षा मोठ्या यंत्रणेसाठी अनुदान ७८ हजारांपर्यंत मर्यादित आहे.

विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील आदर्श गाव, मान्याचीवाडी या गावांना लवकरच सौर ऊर्जेद्वारे शंभर टक्के वीजपुरवठा करण्यात येणार आहे. गावे लवकरच ‘सौरग्राम’ म्हणून लौकिक प्राप्त होणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane FRP Hike: 'कशाला शेतकऱ्यांची फसवणूक करताय?'; प्रतिटन १०० रुपयांच्या एफआरपी वाढीवर राजू शेट्टींचा सवाल

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक राज्यात प्रथम क्रमांकावर नेऊ : आमदार जयंत पाटील

Kolhapur Tiger Corridor: व्याघ्रप्रकल्पाबाबत स्थानिकांचे म्हणणे केंद्राला कळविणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Galyukt Jamin: शेतात गाळ टाकण्यासाठी सोप्या पण महत्त्वाच्या टिप्स

Tree Transplantation Initiative: नाशिकमध्ये वृक्ष पुनर्रोपण उपक्रमाला चालना

SCROLL FOR NEXT