Sugarcane Farm Fire Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Production : ब्राझीलमध्ये वणव्यामुळे साखर उत्पादनात दहा टक्क्यांनी घट

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : ब्राझीलमध्ये गेल्या महिन्यात ऊस शेतीला लागलेल्या मोठ्या आगीचा फटका बसून ब्राझीलचे साखर उत्पादन घटले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या ऑगस्टमध्ये साखर उत्पादन दहा टक्क्यांनी घटले आहे. झपाट्याने आग पसरत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे अडचणीचे ठरत आहे.

यंदा भारतासारख्या देशाने साखर निर्यातीवर बंदी कायम ठेवल्याने ब्राझीलमधील साखरेला चांगला दर होता. ऑगस्टपर्यंत ब्राझीलच्या हंगाम सुरळीत सुरू होता. ब्राझीलमध्ये तयार होणारी बहुतांश साखर जागतिक बाजारपेठेत येत असल्याने साखरेच्या दरात फारशी वाढ होत नव्हती. दर कमी असले तरी फार नीचांकी पातळीवर नसल्याने याचा फायदा ब्राझीलला होत होता. हंगाम वेगात सुरू असताना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मात्र ब्राझीलच्या ऊस शेतीला विविध भागात आग लागली ही आग झपाट्याने पसरली.

अचानक लागलेली ही आग नियंत्रित करणे ब्राझीलला सहज शक्य झाले नाही. यामुळे सुमारे साठ हजार हेक्टरवरील उसाचे क्षेत्र भस्मसात झाल्याची भीती व्यक्त होत आहे. याचा तातडीचा परिणाम ऑगस्टमधील साखर उत्पादनावर दिसून आला आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत या ऑगस्टमध्ये दहा टक्क्यांनी उत्पादन घटले आहे. आतापर्यंत सुमारे ५० लाख टन उसाचे नुकसान झाले आहे. हे नुकसान जवळजवळ १०० टक्के झाले असल्याचा अंदाज ब्राझीलमधील साखर उद्योगाचा आहे. जळालेल्या उसातून केवळ एक टक्का उत्पादन निघू शकेल, अशी शक्यता तेथील साखर उद्योगाने व्यक्त केली आहे.

आंतरराष्ट्रीय साखर बाजारात मात्र यंदा या नुकसानीमुळे किती काळापर्यंत साखर उत्पादन कमी येईल याबाबतचा अंदाज व्यक्त होत नसल्याने साखरेचे दर कमी-जास्त होत आहेत. भारताने अजूनही नव्याने धोरण स्पष्ट केले नाही, त्यामुळे यंदाच्या हंगामात भारतातून बाहेर साखर येणार नाही, ही शक्यता आता गडद होत आहे. अन्य देशांमध्येही वातावरणातील बदलामुळे ऊस पिकाची वाढ फारशी झालेली नाही. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर ब्राझील हा एकमेव स्रोत जागतिक बाजारामध्ये साखरेसाठी होता. आता अडचणी येत असल्याने यंदाच्या बाजारात साखर किती प्रमाणात येईल, याचा अंदाज व्यक्त करणे अवघड होत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

भारताच्या भूमिकेविषयी उत्सुकता

भारताच्या भूमिकेविषयी अजूनही जागतिक बाजारामध्ये उत्सुकता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भारतामध्ये जादा साखर शिल्लक असल्याने केंद्र सरकार निर्यातीला काही प्रमाणात परवानगी देईल, असा आशावाद आंतरराष्ट्रीय साखर बाजारात आहे. मात्र केंद्राकडून अजूनही नेमका अंदाज उद्योगाला देण्यात आला नसल्याने निर्यातीच्या धोरणाविषयी संभ्रम कायम आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli Bribe Case : शेतीच्या कामासाठी मंडल अधिकाऱ्यासह तिघांना लाच घेताना अटक

Anandacha Shidha Ration : ‘आनंदाचा शिधा’ अडकला तेलात; कोल्हापुरातील लाभार्थ्यांना प्रतीक्षा

PM Kisan Yojana : पीएम किसान १८ व्या हप्त्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातील १७ हजार शेतकरी राहणार वंचित

Safflower Farming : जिरायती क्षेत्रासाठी करडई फायदेशीर

Livestock : राज्यातील शेळी, मेंढी, अश्व संपदा

SCROLL FOR NEXT