Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : अमरावती जिल्ह्यातील एक लाखावर शेतकरी अर्थसाह्यासाठी पात्र

Crop Damage : पावसामुळे व बाजारात भाव न मिळाल्याने झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेले अर्थसाह्य मिळण्यासाठी ई-केवायसी व संमतिपत्र अनिवार्य करण्यात आले आहे.

Team Agrowon

Amaravati News : पावसामुळे व बाजारात भाव न मिळाल्याने झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेले अर्थसाह्य मिळण्यासाठी ई-केवायसी व संमतिपत्र अनिवार्य करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील १ लाख ६१ हजार ५०८ शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यांनी समंतीपत्र सादर केल्यानंतर त्यांना अर्थसाह्य मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी झाली नाही त्यांनी सेतूतून किंवा संकेतस्थळावरून ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

राज्य सरकारने सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना जाहीर केली असून ०.२० ते २ हेक्टरच्या मर्यादेत अर्थसाह्य जाहीर केले आहे. १ हजार ते पाच हजार रुपये प्रतिहेक्टर या मर्यादेत अनुदान दिले जाणार आहे.

त्यासाठी ई-पीक नोंदणी ग्राह्य धरण्यात आली असून, या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया केल्यासच त्यांना अर्थसाह्य मिळणार आहे. जिल्ह्यातील १ लाख ६१ हजार ५०८ शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी यातील बऱ्याच जणांचे संमतीपत्र सादर झालेले नाही.

काही शेतकऱ्यांची शेती सामायिक स्वरूपाची असल्याने त्यांना संमतीपत्र देणे बंधनकारक आहे. जेणेकरून सात-बारावरील एकापेक्षा अधिक असलेल्या सदस्यांपैकी एकाच्या खात्यावर अनुदान जमा करता येणार आहे.

ज्या शेतकऱ्यांचे नाव यादीत आले आहे त्यांनी वैयक्तिक व सामायिक शेतीसंदर्भातील संमतीपत्र कृषी सहायकाकडे तातडीने जमा करावे. जेणेकरून त्यांचे अनुदान त्यांनी सुचविलेल्या सदस्याच्या खात्यावर जमा करणे सुलभ होणार आहे.
- राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT