औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ५) हिरव्या मिरचीची ८३ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला १००० ते ३२०० रुपये क्विंटल दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
औरंगाबाद बाजार समितीत शनिवारी कांद्याची ५६५ क्विंटल आवक झाली. कांद्याला २५० ते ७०० रुपये क्विंटल दर मिळाला. फ्लॉवरची ३० क्विंटल आवक झाली. फ्लॉवरला ६०० ते १००० रुपये क्विंटल दर मिळाले. टोमॅटोची आवक १३७ क्विंटल होती. टोमॅटोला ४०० ते ८०० रुपये क्विंटल दर मिळाले. वांग्याची २४ क्विंटल आवक झाली. वांग्याला ४०० ते १२०० रुपये क्विंटल दर मिळाला. गवारीची आवक १३ क्विंटल झाली. गवारीला २००० ते २५०० रुपये क्विंटल दर मिळाले.
बाजारसमितीत काकडीची आवक ५१ क्विंटल झाली. काकडीला ४०० ते ८०० रुपये क्विंटल दर मिळाला. भेंडीची ४५ क्विंटल आवक झाली. भेंडीला ६०० ते २००० रुपये क्विंटल दर मिळाला. कोबीची ११४ क्विंटल आवक झाली. कोबीला २०० ते ५०० रुपये क्विंटल दर मिळाला. लिंबूची ३० क्विंटल आवक झाली. लिंबास ६०० ते १००० रुपये क्विंटल दर मिळाले.
मेथीची ११ हजार जुड्या आवक झाली. मेथीला ५०० ते ७०० रुपये प्रतिशेकडा दर मिळाला. पालकाची १० हजार जुड्या आवक झाली. पालकला ३०० ते ४०० रुपये प्रतिशेकडा दर मिळाला. कोथिंबिरीची २१ हजार जुड्या आवक झाली. कोथिंबीरचे दर ४०० ते ७०० रुपये प्रतिशेकडा राहिले. चवळीची ७ क्विंटल आवक झाली. चवळीला १५०० ते १८०० रुपये क्विंटल दर मिळाला. वालशेंगांची ३ क्विंटल आवक झाली. वालशेंगांचे दर ३००० ते ३८०० रुपये क्विंटल राहिले.
कारल्याची आवक ४ क्विंटल झाली. कारल्याला १००० ते १८०० रुपये क्विंटल दर मिळाला. भुईमूग शेंगांची ४२ क्विंटल आवक झाली. भुईमूग शेंगांना ३००० ते ३५०० रुपये क्विंटल दर मिळाले. ढोबळी मिरचीची ५८ क्विंटल आवक झाली. ढोबळ्या मिरचीला ८०० ते १००० रुपये क्विंटल असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.