चवळी शेंगा
चवळी शेंगा 
बाजारभाव बातम्या

जळगाव येथे चवळी शेंगा ३५०० रुपये क्विंटल

टीम अॅग्रोवन

जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.१६) चवळी शेगांची चार क्विंटल आवक झाली. चवळी शेंगेस ३५०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. चवळी शेगांची आवक पाचोरा, जामनेर व जळगाव तालुक्‍यांतून होत आहे. चवळी शेंगांची आवक कमी झाल्याची माहिती बाजार समितीमधून मिळाली.

बाजारात शनिवारी गंगाफळाची (लाल भोपळा) २५ क्विंटल आवक झाली. त्यास ७०० ते १२०० रुपये, तर सरासरी ९०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. लिंबाची ११ क्विंटल आवक झाली. लिंबाला १००० ते २३०० रुपये, तर सरासरी १८०० रुपये क्विंटल असा दर होता. भेंडीची १५ क्विंटल आवक झाली. भेंडीला १२०० ते २३०० रुपये, तर सरासरी १८०० रुपये क्विंटल दर मिळाला.

बाजारसमितीत पालकाची तीन क्विंटल आवक झाली. पालकास २००० रुपये क्विंटल असा दर मिळाला.  आल्याची (अद्रक) २० क्विंटल आवक झाली. त्यास ३५०० ते ६००० रुपये, तर सरासरी ४५०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. बटाट्याची ३०० क्विंटल आवक झाली. बटाट्यास १२०० ते १४२० रुपये, तर सरासरी १३०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. लाल कांद्याची ४८० क्विंटल आवक झाली. लाल कांद्याला ३७५ ते १००० रुपये, तर सरासरी ६८५ रुपये क्विंटल असा दर मिळाला. कारल्याची चार क्विंटल आवक झाली. कारल्याला १००० ते २००० रुपये, तर सरासरी १५०० रुपये क्विंटल असा दर मिळाला.

बाजारसमितीत कोबीची १२ क्विंटल आवक झाली. कोबीला १५०० ते २००० रुपये, तर सरासरी १८०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. कैरीची २५ क्विंटल आवक झाली. कैरीला १५०० ते २५०० रुपये, तर सरासरी २००० रुपये क्विंटल असा दर होता. हिरव्या मिरचीची ३५ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला १५०० ते १८०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. मेथीची चार क्विंटल आवक झाली. तिला ३००० रुपये क्विंटल असा दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT