अकोल्यात सोयाबीन प्रतिक्विंटल २५५० ते ३०२५ रुपये
अकोल्यात सोयाबीन प्रतिक्विंटल २५५० ते ३०२५ रुपये 
बाजारभाव बातम्या

अकोल्यात सोयाबीन प्रतिक्विंटल २५५० ते ३०२५ रुपये

टीम अॅग्रोवन

अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची अावक मोठ्या प्रमाणात वाढली अाहे. बुधवारी (ता. २४) सुमारे ८६०९ क्विंटल सोयाबीनची अावक झाली होती. सोयाबीनला किमान २५५० तर कमाल ३०२५ रुपये भाव मिळाला.

सोयाबीनची या भागात सर्वत्र लागवड केली जाते. सध्या सोयाबीनचा हंगाम सर्वत्र जोमाने सुरू झाल्याने अाठवडाभरात सोयाबीनच्या अावकेत मोठी वाढ झाली अाहे. अागामी दिवाळी सण तसेच रब्बी लागवडीसाठी लागणाऱ्या पैशांची तजवीज करण्यासाठी शेतकरी सोयाबीनची विक्री करण्यासाठी गर्दी करू लागले अाहेत. अागामी काही दिवस ही अावक सातत्याने होत राहणार असल्याची शक्यता व्यापारी सूत्रांनी व्यक्त केली.

अकोला बाजार समितीत हरभऱ्याची अावकही हजार पोत्यांवर पोचली अाहे. हरभरा ३५०० ते ४१०० दरम्यान विक्री झाला. सरासरी ३८०० रुपये दर होता. मुगाची अावक काहीची मंदावली असून, ३८२ पोते विक्रीला अाले होते. मूग ४२०० ते ५६०० यादरम्यान विकल्या गेला. उडदाची ३३७ क्विंटल अावक होऊन कमीत कमी ३९०० व जास्तीत जास्त ४५०० रुपये भाव होता. बाजारात ज्वारीची विक्री १२५० ते १७०० दरम्यान झाली. ३७ पोते ज्वारी विक्रीसाठी अाली होती. गहू १६५० ते १८५० रुपये दराने ४९ पोते विक्री झाला.

वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीचे दर  
वाण किमान दर कमाल दर अावक क्विंटलमध्ये
सोयाबीन २८५० ३१११ ४५००
हरभरा ३४५० ३९०० ५१४
तूर ३४५१ ३८०० १०७
उडीद ४२५० ४६०० ३०५
मूग ५२२५ ५६५६ १६
गहू १६७५ २२०० ८५
ज्वारी ९५० ११५०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT