The soybean Incoming increased in Nagar
The soybean Incoming increased in Nagar  
बाजारभाव बातम्या

नगरला सोयाबीनची आवक वाढली

टीम अॅग्रोवन

नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात १७७७ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. सोयाबीनला २८०० ते ३७०० रुपयांचा दर मिळाला आहे. लाल मिरचीचीही चांगली आवक होत आहे. भाजीपाल्याच्या आवकेत सतत चढउतार होत आहे. त्यामुळे दरही कमी-जास्त होत आहेत. 

नगर बाजार समितीत गेल्या पंधरा दिवसांपासून सोयाबीनची आवक बऱ्यापैकी होत आहे. मात्र हमी दरापेक्षा कमीच दर येथे मिळत आहे. गावरान ज्वारीची ११२ क्विंटलची आवक झाली. ज्वारीला ३१०० ते ४३०० रुपयांचा दर मिळाला. बाजरीची १४७ क्विंटलची आवक झाली आणि १७३५ ते २१५१ रुपयांचा दर मिळाला.

हरभऱ्याची २०९ क्विंटलची आवक होऊन ३००० ते ४१०० रुपयांचा दर मिळाला. मुगाची ३४ क्विंटलची आवक होऊन ५००० ते ६३०० रुपयांचा दर मिळाला. लाल मिरचीचीही गेल्या पंधरा दिवसांपासून चांगली आवक होत आहे. लाल मिरचीची आठ दिवसांत ५३१ क्विंटलची आवक झाली असून, लाल मिरचीला ५३३५ ते १७६४० चा प्रतिक्विंटलचा दर मिळाला. मक्याची ८० क्विंटलची आवक होऊन १७२५ रुपयांचा दर मिळाला. ३११ क्विंटल गूळडागाची आवक होऊन ३०६० ते ४५०० रुपयांचा दर मिळाला.

उडदाची १८९ क्विंटलची आवक होऊन सात हजार रुपयाचा दर मिळाला. गव्हाची आवक मात्र कमी झाली आहे. गव्हाची २८ क्विंटलची आवक होऊन २२३६ रुपयांचा दर मिळाल. तुरीची आवकही कमी झाली आहे. तुरीचा अवघी पाच क्विंटलची आवक होऊन ४००० ते ४५०० रुपयांचा दर मिळाला.

भाजीपाल्यात टोमॅटो, वांगी, फ्लॉवर, कोबी, काकडी, गवार, घोसाळे, दोडका, कारले, घोवडा, डिंगरी, बटाटे, शेवगा, आद्रक, कोथिंबीर, पालक, करडीभाजी, मेथी यांना चांगली मागणी आहे. मात्र आवकेत व दरात सतत चढउतार होत आहेत, असे बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT