सोयाबीन
सोयाबीन  
बाजारभाव बातम्या

वाशीममध्ये सोयाबीन प्रतिक्विंटल ३००० ते ३४२५ रुपये

टीम अॅग्रोवन

वाशीम : गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात सातत्याने वाढ होत असून, वऱ्हाडातील वाशीम बाजार याबाबतीत अग्रेसर ठरला अाहे. शनिवारी (ता. २०) येथील बाजारात सोयाबीन ३००० ते ३४२५ रुपये क्विंटल दराने विकले. साेयाबीनच्या दरात वाढ होत असल्यापासून अावकेत सातत्याने सुधारणा होत अाहे. पाच हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती.  राज्यात वाशीम बाजार समितीत सोयाबीनला सध्या उच्चांकी दर मिळत अाहेत. याचाच परिणाम अावकेवर झाला अाहे. जिल्ह्यासह लगतच्या भागातून या ठिकाणची अावक वाढत अाहे. शनिवारी या बाजारात हरभऱ्याची एक हजार क्विंटल अावक झाली होती. हरभऱ्याला ३२०० ते ३८५० रुपये दर मिळाला. उडादाची विक्री ३२०० ते ३६२० दरम्यान झाली. मुगाचा दर चार ते साडेचार हजार होत. तुरीचा हंगाम सुरू झाला असून, या बाजारात तुरीच्या अावकेतही सुधारणा होऊ लागली अाहे. शनिवारी तीन हजार क्विंटल तुरीची अावक होती.  हमीभाव खरेदी अद्यापही सुरू झालेली नसल्याने सध्या ३९०० ते ४४२० दरम्यान तुरीची विक्री होत अाहे. हळद उत्पादकांसाठी वाशीम येथे विक्री सुविधा असून, शनिवारी सात ते साडेसात हजारदरम्यान हळदीची विक्री झाली. हळदीचा हंगाम अागामी महिन्यात अाता सुरू होत अाहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

Food Grains : भरडधान्येच तारतील; आर्थिक आधार देतील

River Pollution : नदी प्रदूषणमुक्त करणारा ‘महाड पॅटर्न’

Agriculture Electricity : कृषी पंपाच्या वीजपुरवठा अनियमित पिकांना फटका; शेतकरी अडचणीत

SCROLL FOR NEXT