Sesame seeds in Gevrai market, Increased rates to matki
Sesame seeds in Gevrai market, Increased rates to matki 
बाजारभाव बातम्या

गेवराईतील बाजारात तीळ, मटकीला वाढीव दर

टीम अॅग्रोवन

गेवराई, जि. बीड : गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात मटकी, तिळाची आवक नगण्यच राहिली. त्यामुळे त्यांना वाढीव दर मिळाले. दुसरीकडे उडदाची एकवेळ, तर हरभऱ्याची केवळ दोन वेळाच आवक झाली. मात्र, या दोन्हीचे दर कमीच होते.

गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १७ ते २२ जानेवारी दरम्यान मटकीची दोन वेळा मिळून २ क्‍विंटल आवक झाली. तिला एकवेळा ८ हजार रुपये, तर दुसऱ्या वेळी १०६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. तिळाचीही केवळ एक वेळा एक क्‍विंटल आवक झाली. या तिळाचे दर ९ हजार रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. उडदाची आवक एकवेळा एक क्‍विंटल झाली. त्यास ४ हजार रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. हरभऱ्याची दोन वेळा मिळून २ क्‍विंटल आवक झाली. त्यास एकवेळ ३००० रुपये, तर दुसऱ्या वेळी ३६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

बाजरीची एकूण आवक २६१ क्‍विंटल झाली. २६ ते ७२ क्‍विंटल आवक झालेल्या बाजरीला सरासरी १७५० ते २१ रुपये दर मिळाला. मुगाची चार वेळा मिळून १३ क्‍विंटल आवक झाली. त्यास सरासरी ५००० ते ५८५० रुपये दर मिळाला. लाल, पांढऱ्या व काळ्या तुरीपैकी पांढऱ्या तुरीची सर्वाधिक १५३५ क्‍विंटल आवक झाली. या तुरीचे सरासरी दर ५७५० ते ५८५० रुपये राहिले. काळ्या तुरीची एकूण ३४० क्‍विंटल आवक होऊन सरासरी ५५०१ ते ५८५० रुपये, लाल तुरीची एक क्‍विंटल आवक होऊन ५८०० रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला. 

सोयाबीनला ५७०० ते ५८०० रुपये

ज्वारीची आवक ३८८ क्‍विंटल झाली. ४३ ते १०० क्‍विंटल आवक झालेल्या ज्वारीला सरासरी १६०० ते १८५० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. सोयाबीनची एकूण आवक ४०० क्‍विंटल झाली. ४० ते १११ क्‍विंटल आवक झालेल्या सोयाबीनला सरासरी ५७०० ते ५८०० रुपये दर मिळाला. गव्हाची एकूण आवक ५४४ क्‍विंटल झाली. ५५ ते १२१ क्‍विंटल आवक झालेल्या गव्हाला सरासरी १८५० ते २१०० रुपये दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वाढले; कापूस, सोयाबीन, मका, हळद तसेच टोमॅटोचे काय आहेत दर ?

Pre-Sowing Tillage : धूळवाफेवरील भातपिकाच्या पेरणीपूर्व मशागतीला वेग

Water Scarcity : जळगाव जिल्ह्यातील पूर्व भागात पाणी टंचाई कमी

Kharif Season : खरिपासाठी पैसा उभा करण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान

Summer Heat : उन्हाचा चटका; पिकांनाही फटका

SCROLL FOR NEXT