Red chillies 4250 to 13050 rupees per quintal in Nagar 
बाजारभाव बातम्या

नगरमध्ये लाल मिरची ४२५० ते १३०५० रुपये

भाजीपाल्यांत कोबी, फ्लावर, टोमॅटो, वांगी, बटाटे, कोथिंबीर, गवार, घोसाळे, हिरवी मिरची, सिमला मिरची, मेथी आदी भाज्यांना अधिक मागणी राहिली. आवकेत चढ-उतार होत आहे. दरातही कमी-जास्त होत आहे. - अभय भिसे, सचिव, नगर बाजार समिती.

टीम अॅग्रोवन

नगर :  नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात ३४५ क्विंटल लाल मिरचीची आवक झाली. लाल मिरचीला प्रती क्विंटल ४२५० ते १३०५० रुपयांचा दर मिळाला. गेल्या पंधरा दिवसांपासून बाजार समितीत लाल मिरचीची आवक वाढली आहे. त्यासोबत मका, सोयाबीनचीही चांगली आवक होत आहे.

नगर बाजार समितीत गेल्या आठ दिवसांत बाजरी, लाल मिरची, सोयाबीन, मक्याची चांगली आवक होत आहे. बाजरीची ४१७ क्विंटलची आवक झाली आहे. तिला १८५० ते २५०० रुपयांचा दर मिळाला. गावरान ज्वारीची ४९ क्विंटलची आवक होऊन २७०० ते ३५०० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. हरभऱ्याची १२६ क्विटंलची आवक होऊन ४४०० रुपयांचा दर मिळाला.

गव्हाची ९५ क्विटंलची आवक होऊन २००० ते २००१ रुपये दर मिळाला. सोयाबीनची ८४६ क्विंटलची आवक होऊन २७०० ते ४१०४ रुपयांचा दर मिळाला. मक्याची ३४७ क्विटंल आवक होऊन १८१५ रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. गूळडागाची ६१८ क्विंटलची आवक झाली. त्यास २७०० ते ४४०० चा दर मिळाला. मठाची ४० क्विंटलची आवक होऊन ८५०० ते ९५०० रुपयांचा दर मिळाला. उडदाची १६५ क्विटंलची आवक होऊन ६३०० रुपयांचा दर मिळाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan Installment Date : पीएम किसानच्या हप्त्याची प्रतिक्षा कायम; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

Agrowon Podcast: उडदाचे भाव दबावातच; बाजरीचे दर स्थिर, कोबी- मेथीचा भाव टिकून, फ्लाॅवर दर तेजीत

Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर वाढणार; विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर अधिक राहणार

APMC SIT Investigation: नागपूर बाजार समितीच्या चौकशीसाठी एसआयटी

Cotton Farming : पूर्वहंगामी कापूस पिकाची वाढ जोमात

SCROLL FOR NEXT