जळगावात लाल कांद्याच्या दरांवर पुन्हा दबाव
जळगावात लाल कांद्याच्या दरांवर पुन्हा दबाव 
बाजारभाव बातम्या

जळगावात लाल कांद्याच्या दरांवर पुन्हा दबाव

टीम अॅग्रोवन

जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. ३) लाल कांद्याची सुमारे १५०० क्विंटल आवक झाली. किमान ३०० व कमाल ७०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. दरात दोन दिवसांत क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांची घट झाली असून, पूर्वमोसमी पावसाचे संकेत लक्षात घेऊन आवक वाढल्याने व्यापारी व अडतदार यांनी मिलीभगत करून हे दर पाडल्याचा दावा शेतकरी करीत आहेत.  जळगाव, अडावद (ता. चोपडा), चाळीसगाव येथील बाजारात लाल कांद्याच्या दरात घट झाली आहे. जूनमध्ये शेतकऱ्यांना पैशांची आवश्‍यकता असते, पाऊस आला तर शेतात साठविलेल्या कांद्याचे नुकसान होईल, या भीतीने सोमवारी लाल कांदा अनेक शेतकऱ्यांनी आणला. परिणामी आवक वाढली. बाजारातील चित्र लक्षात घेऊन अडतदार व व्यापारी यांनी दर पाडले. शुक्रवारी (ता. ३१ मे) कांद्याचे दर १००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. किमान दर ४५० रुपयांपर्यंत होते. सोमवारी मात्र दर्जेदार कांद्यासही ७०० रुपयांपर्यंतचे दर मिळाले. आवक जळगाव, पाचोरा, भुसावळ, धुळे या भागातून होत आहे. कांद्याची काढणी जिल्ह्यात आटोपली आहे. लागवड कमी झाली होती. आवक मागील हंगामाच्या तुलनेत अधिक असतानादेखील दर हवे तसे नाहीत. किमान दर १२५० ते १५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळावेत, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

जळगाव, धुळे बाजार समितीमधील खरेदीदारांना समज द्या लाल कांद्याचे दर धुळ्यासह जळगाव बाजार समितीत कमी आहेत. आवक कमी असताना दर्जेदार कांद्याचे दर कमी कसे? मागील वर्षी कमाल दर २५ ते २८ रुपये प्रतिकिलोपर्यंत बाजार समितीत मिळाले होते. मागील हंगामात मे अखेरीस आवक २४०० ते २५०० क्विंटलपर्यंत होती. या हंगामात आवक कमी, कांद्याचा दर्जा चांगला असताना दर कमी का? यासंदर्भात जळगाव व धुळे येथील बाजार समितीमधील खरेदीदार व अडतदार यांची चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

SCROLL FOR NEXT