Pomegranate arrivals increase in Nashik; Decrease in rates
Pomegranate arrivals increase in Nashik; Decrease in rates 
बाजारभाव बातम्या

नाशिकमध्ये डाळिंबाची आवक वाढली; दरात घट

टीम अॅग्रोवन

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत सप्ताहात डाळिंबाची आवक ९,४७७ क्विंटल झाली. आवक वाढली असल्याचे दिसून आले. यासह दर स्थिर असल्याचे पाहायला मिळाले. मृदुला वाणास २५० ते ७,०००, तर सरासरी ४,५०० रुपये दर मिळाला. गेल्या दोन सप्ताहापूर्वी डाळिंबाची आवकेची नोंद ७,७४४ होऊन मृदुला वाणास ३०० ते ९,०००, तर सरासरी ६,००० रुपये दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

चालू सप्ताहात उन्हाळ कांद्याची आवक १०,८०४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ५५० ते २,००१, तर सरासरी दर १५५० रुपये राहिला. बटाट्याची आवक ५,४०४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४०० ते १,३००, तर सरासरी दर ७०० रुपये राहिला. लसणाची आवक १२६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३,००० ते ९,०००, तर सरासरी दर ५,५०० रुपये राहिला. आल्याची आवक १,०१९ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २,४०० ते ३,८०० तर सरासरी दर ३,००० रुपये राहिला.

सप्ताहात काही फळभाज्यांची आवक कमी, तर काहींची आवक जास्त झाली. त्यामुळे बाजारभाव सुद्धा कमी जास्त निघाले. वालपापडी-घेवड्याची आवक ३,७१६ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल २,५०० ते ३,१०० असा तर सरासरी दर २,८०० रुपये राहिला. घेवड्याला प्रतिक्विंटल ३,००० ते ५,५०० तर सरासरी दर ४,८०० रुपये राहिला. हिरव्या मिरचीची आवक १,८०५ क्विंटल झाली.

लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल २३०० ते ३०००, तर सरासरी दर २,७००रुपये राहिला. गाजराची आवक २०७  क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २,३०० ते ३,०००, तर सरासरी दर २७०० रुपये राहिला.

फळभाज्यांमध्ये टोमॅटोला ७५ ते ३५०, तर सरासरी २२५, वांगी ७७ ते १५०, तर सरासरी १२५ व फ्लॉवर ३० ते १०० सरासरी ६० रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. तर कोबीला १२५ ते २००, तर सरासरी १६० रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले. ढोबळी मिरचीला ५० ते १५०, तर सरासरी दर १०० रुपये असे दर प्रति ९ किलोस मिळाले.

वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भोपळा ७० ते १५० तर सरासरी ९०, कारले ८० ते १५० तर सरासरी १२०,गिलके २५० ते ३५० तर सरासरी ३००,दोडका २०० ते ४०० तर सरासरी दर ३०० रुपये असे प्रति १२ किलोस दर मिळाले. काकडीला १०० ते ३२० तर सरासरी १७० रुपये असे २० किलोस दर मिळाले. 

फळांमध्ये चालू सप्ताहात केळीची आवक ११४० क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ८५० ते १,५००,  तर सरासरी दर १,२५० रुपये मिळाला. आंब्याची आवक १,१९५ क्विंटल झाली. नीलम वाणाला ३,००० ते ६,००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सरासरी दर ५,००० रुपये मिळाला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT