Onion incoming declined in Khandesh
Onion incoming declined in Khandesh 
बाजारभाव बातम्या

खानदेशात कांदा आवक घटली

टीम अॅग्रोवन

जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजारांमध्ये कांद्याचे लिलाव सुरू झाले आहेत. परंतु, आवक गेल्या आठ ते १० दिवसांत सतत कमी झाली आहे. 

गेल्या पंधरवड्यात चाळीसगाव, धुळे, जळगाव येथील बाजारात मिळून रोज दोन ते अडीच हजार क्विंटल लाल कांद्याची आवक होत होती. सध्या ही आवक मिळून प्रतिदिन दीड हजार क्विंटलवर आली आहे. कमी दर्जाच्या कांद्याला १५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटलचे दर आहेत. तर, दर्जेदार कांद्याला कमाल सहा हजार रुपये प्रतिक्विंटलचे दर विविध बाजारांमध्ये मिळाले आहेत. शेतकऱ्यांकडून आवक रखडत सुरू आहे. 

जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, जळगाव, धुळ्यातील धुळे येथे लिलाव सुरू झाले आहेत. चाळीसगाव येथे लिलावांना मध्यंतरी प्रतिसाद मिळाला. सुमारे ६०० क्विंटल कांद्याची आवक रोज झाली. जळगावातही सुमारे ५५० क्विंटल लाल कांद्याची आवक होत होती. जळगावातही कमाल दर ६२०० रुपये प्रतिक्विंटल, असे मिळत होते.

दर्जेदार कांद्याची आवक कमी झाली आहे. नवीन कांद्याची काढणी सुरू झालेली नाही. आवक कमी झाल्याने लिलावही संथ आहेत. 

चाळीसगाव येथे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, औरंगाबादमधील कन्नड, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव येथूनही कांद्याची आवक कमी झाली. जळगाव येथे यावल, जळगाव, औरंगाबादमधील सोयगाव, सिल्लोड आदी भागातून कांद्याची आवक झाली. अडतदार ते बाहेरील व्यापारी, असे व्यवहारदेखील झाले.  काही शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे. पुढील महिन्यात ही आवक वाढेल, अशी स्थिती आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT