Millet, bean prices stable; Fluctuation in corn prices
Millet, bean prices stable; Fluctuation in corn prices 
बाजारभाव बातम्या

औरंगाबाद : बाजरी, सोयाबीनचे दर स्थिर; मक्यात चढ-उतार

Santosh Munde

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजरी, सोयाबीनचे दर स्थिर असले, तरी मक्याच्या दरात मात्र चढ-उतार आहेत. शिवाय मका, बाजरी, सोयाबीनसह फळांच्या दरांतील स्थिरता, दर त्यांच्या दर्जावर अवलंबून असल्याची स्थिती आहे.   

औरंगाबाद बाजार समितीमध्ये २५ ते ३० नोव्हेंबरदरम्यान बाजरीच्या आवकेत प्रचंड चढ-उतार पाहायला मिळाले. परंतु, दर मात्र १४२५ ते २६०० रुपये प्रतिक्‍विंटल पुढे गेले नाहीत. मक्याची आवकही बऱ्यापैकी चढ-उताराची राहिली. तर, दर ९०० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटलदरम्यान राहिले. सोयाबीनची आवक ३ ते ७५ क्‍विंटलदरम्यान झाली. सोयाबीनला २००० ते ३६५० रुपये प्रतिक्‍विंटलदरम्यान दर मिळाला. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, मका, बाजरी या पिकांची पुरती वाट लावली. उत्पादनाच्या दर्जावर प्रश्‍नचिन्ह असल्याने अपवाद वगळता सोयाबीन, मका, बाजरीला हमी दरापेक्षा कमीच दर मिळत असल्याचे चित्र होते. 

फळपिकांमध्ये सीताफळाची आवक २० ते ३९ क्‍विंटल दरम्यान राहिली. त्यांना १५०० ते ६००० रुपये प्रतिक्‍विंटलपर्यंत दर मिळाला. ४ ते १५ क्‍विंटलदरम्यान आवक झालेल्या मोसंबीचे दर १४०० ते ६५०० रुपये प्रतिक्‍विंटलपर्यंत राहिले. १५ ते २८ क्‍विंटलदरम्यान आवक झालेल्या संत्र्यांचे दर ६०० ते ६०० ते ३२०० रुपये राहिले. २५ नोव्हेंबरला २८ क्‍विंटल आवक झालेल्या पपईला १००० ते १७०० रुपये प्रतिक्‍विंटल, तर ३० नोव्हेंबरला ७ क्‍विंटलला १००० ते १४०० रुपये दर राहिले. 

डाळिंबांच्या आवकेत प्रचंड चढ-उतार पाहायला मिळाला. २५ नोव्हेंबरला ६४ क्‍विंटल आवक झालेल्या डाळिंबाचे दर ५००ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटल, २६ नोव्हेंबरला ४ क्‍विंटल आवक झालेल्या डाळिंबाला ३०० ते ६००० रुपये प्रतिक्‍विंटल, २७ नोव्हेंबरला १०९ क्‍विंटलला २०० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २८ नोव्हेंबरला १०९ क्‍विंटल आवक झालेल्या डाळिंबांना १०० ते ६००० रुपये प्रतिक्‍विंटल, तर ३० नोव्हेंबरला १३ क्‍विंटलला ३०० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT