कोल्हापुरात हिरवी मिरची प्रतिदहा किलो १५० ते ३०० रुपये 
बाजारभाव बातम्या

कोल्हापुरात हिरवी मिरची प्रतिदहा किलो १५० ते ३०० रुपये

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. २८) हिरवी मिरची दहा किलोस १५० ते ३०० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीची २२६ पोती आवक झाली. टोमॅटोच्या आवकेत काहीशी घट होती. टोमॅटोची नऊशे क्रेट आवक झाली. टोमॅटोस दहा किलोस १० ते ९० रुपये दर मिळाला.

वांग्याची ४२९ करंड्या आवक होती. वांग्यास दहा किलोस ५० ते ४०० रुपये दर मिळाला. घेवड्याच्या आवकेतील घट कायम होती. घेवड्याची केवळ ७ पोती आवक होती. घेवड्यास दहा किलोस १५० ते २०० रुपये दर मिळाला. ओला वाटाण्याची २७१ पोती आवक होती. ओला वाटाण्यास दहा किलोस १०० ते ५०० रुपये दर मिळाला. दोडक्‍याची चांगली आवक होत आहे. ओल्या भुईमूग शेंगेची ६४ पोती आवक झाली. ओल्या भुईमूग शेंगेस दहा किलोस २२० ते २५० रुपये दर होता. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे भाजीपाल्याची आवक कमी जास्त प्रमाणात होत असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.

दोडक्‍याची १७४ करंड्या आवक झाली. दोडक्‍यास दहा किलोस ५० ते ३०० रुपये दर मिळाला. पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीच्या आवकेत घट झाली. कोथिंबिरीची ६ हजार पेंढ्या आवक झाली. कोथिंबिरीस शेकडा ३०० ते ७०० रुपये दर मिळाला. मेथीस शेकडा ३०० ते ८०० रुपये दर मिळाला. मेथीची आठ हजार पेंढ्या आवक होती. पालक, शेपूस ३०० ते ६०० रुपये दर होता. फळांमध्ये पेरूची पंचवीस डाग आवक होती. पेरू डागास १०० ते २०० रुपये दर मिळाला. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे भाजीपाल्याच्या व्यवस्थापनात मोठ्या अडचणी निर्माण होत आहे. कोल्हापूर बरोबर बेळगाव भागातही पाऊस असल्याने वाफशाअभावी भाजीपाल्याची काढणी व मशागती अशक्‍य बनत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Palm Oil Prices : जागतिक बाजारात पामतेलाचे भाव वाढलेले; मलेशियाला होतोय फायदा

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

SCROLL FOR NEXT