भाजीपाला
भाजीपाला  
बाजारभाव बातम्या

जळगावात भाजीपाल्याच्या दरात तेजीचा कल

Chandrakant Jadhav

जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वच भाजीपाल्याच्या दरात गत सप्ताहात तेजी दिसून आली. भरीताचे वांगे, मिरची, कांदे यांचा तुटवडा निर्माण झाल्याने या भाजीपाल्यास जास्त दर मिळाले, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.  भरीताच्या वांग्याची गत सप्ताहातील आवक प्रतिदिन २१ क्विंटल एवढी राहिली. भरीताच्या वांग्याला १३०० ते २४०० व सरासरी १८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. जिल्ह्यातून मुंबई, नाशिकपर्यंत भरीताची वांगी विक्रीसाठी पाठविली जातात. दिवाळीनंतर ही विक्री वाढते. अर्थातच भरीताच्या वांग्यांना मागणी वाढते असते. यातच वांग्यांची आवक हवी तशी नव्हती. त्यामुळे दर टिकून राहिले. किंबहुना अधिकचे दर मिळाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.   यासोबत हिरव्या मिरचीची आवक कमी अधिक अशीच राहिली. हिरव्या मिरचीची प्रतिदिन ३६ क्विंटल अशी सरासरी आवक होती. हिरव्या मिरचीला १२०० ते २१०० व सरासरी १६०० रुपये प्रतिक्विंटल दर राहिला. लहान वांग्यांची आवक काहीशी वाढली. लहान वांग्यांची आवक प्रतिदिन २३ क्विंटल एवढी नोंदविण्यात आली. लहान वांग्यांना प्रतिक्विंटल ११०० ते २००० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. गवारची आवक फारशी नव्हती. गवारीची प्रतिदिन तीन क्विंटल अशी आवक नोंदविण्यात आली. या वेळी गावारीस १४०० ते  २४०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळाला. कोथिंबीरची आवक प्रतिदिन दोन हजार जुड्या अशी राहिली. कोथिंबिरीस सरासरी १०० रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला. कोबीची आवक प्रतिदिन २३ क्विंटल  होती. कोबीला कमाल २४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर राहिला. कोबीची आवक फारशी वाढली नाही. सोयाबीनला नाही उठाव बाजार समितीत मुगाची आवक खूपच कमी होती. तर सोयाबीनला उठाव नव्हता. बाजार समितीत गत सप्ताहात मुगाची अतिशय तुरळक अशी आवक होती. या वेळी मुगाला प्रतिक्विंटल चार हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. सोयाबीनची आवक वाढली होती. सोयाबीनला प्रतिक्विंटल २४०० रुपयांपासून दर होते. सोयाबीनची प्रतिदिन ७०० क्विंटल आवक राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.  

केळीचे दर ९०० पर्यंत गत आठवड्यात केळीचे दर ९०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत राहिले. रावेर बाजार समितीने जाहीर केलेल्या दरांनुसार कांदेबाग केळीला ९०० रुपये, जुनारीला ८५० आणि वापसी केळीला ४१० रुपये प्रतिक्विंटल दर होता. १ ते ४ नोव्हेंबरपर्यंत केळीला ९०० रुपये कमाल दर होता. मागील महिन्यातही दर ९०० रुपयेच होते. यापुढे दर न गेल्याने केळी उत्पादकांचा काहीसा हिरमोड झाला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT