नगरला ज्वारीच्या आवकेत वाढ
नगरला ज्वारीच्या आवकेत वाढ 
बाजारभाव बातम्या

नगरला ज्वारीच्या आवकेत वाढ

Suryakant Netke

नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात गावरान ज्वारीची आवक वाढू लागली आहे. गेल्या आठवडाभरात गावरान ज्वारीची २६८ क्विंटलची आवक होऊन ज्वारीला अडीच हजार ते चार हजार रुपयांचा दर मिळाला. बाजरीचीही आवक चांगली होत असून, बाजरीची २१९ क्विंटलची आवक होऊन १५३१ ते दोन हजार चारशे रुपयांचा दर मिळाला. नगर, सोलापूर, मराठवाड्यातील काही भागांतून येथे आवक होत असल्याने नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत गावरान ज्वारीची आवक वाढत असते. यावर्षी आठवडाभरापासून काहीशी आवक वाढली असली तरी दरवर्षीच्या तुलनेत यंदा आवक कमी होत आहे. गेल्या आठवडाभरात काबुली चण्याची १४ क्विंटलची आवक होऊन तीन हजार चारशे ते तीन हजार सातशे रुपयांचा दर मिळाला. तुरीची २८७ क्विंटलची आवक झाली मात्र तुरीची हमीदरापेक्षा कमी दरानेच खरेदी केली जात आहे. तुरीला प्रतिक्विंटल तीन हजार पाचशे ते चार हजार सहाशे पंचवीस रुपयांचा दर मिळाला. हरभऱ्याची १९८ क्विंटलची आवक होऊन ३२७५ ते तीन हजार चारशे रुपयांचा दर मिळाला. मुगाची ४५ क्विंटलची आवक होऊन सहा हजार शंभर ते सात हजार रुपयांचा दर मिळाला. मक्याची ३५ क्विंटलची आवक होऊन एक हजार नऊशे पन्नास रुपयांचा दर मिळाला. गुळाची ३७६ क्विंटलची आवक होऊन दर हजार नऊशे पन्नास ते चार हजार पाचशे रुपयांचा दर मिळाला. लाल मिरचीची आवकही टिकून आहे.  आठवडाभरात लाल मिरचीची ४१२ क्विंटलची आवक होऊन पाच हजार आठशे वीस ते चौदा हजार चौसष्ट रुपयांचा दर मिळाला. या महिन्यात ज्वारीची आवक वाढेल असे बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT