Improvement in garlic, guar rates in the Nagar
Improvement in garlic, guar rates in the Nagar 
बाजारभाव बातम्या

नगरमध्ये गवार, लसणाच्या दरांत सुधारणा कायम

टीम अॅग्रोवन

नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत लसूण, गवारीच्या दरात सुधारणा कायम आहे. गेल्या आठवडाभरात ९५ क्विंटल लसणाची आवक होऊन प्रतिक्विंटल ८००० ते ९००० व सरासरी ८५०० रुपये दर मिळाला. तर, गवारीची ८६ क्विंटलची आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ३००० ते ७००० रुपये व सरसरी ५००० रुपयांचा दर मिळाला. भुसारमध्ये तुरीची आवक वाढली आहे. 

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक कमी जास्त होत असून, दरातही चढउतार होत आहे. टोमॅटोची ३५४ क्विंटलची आवक होऊन प्रतिक्विंटलला ४०० ते १००० रुपयांचा दर मिळाला. फ्लॉवरची २७८ क्विंटलची आवक होऊन ४०० ते ८०० रुपये व कोबीची ३६५ क्विंटलची आवक होऊन ३०० ते ५०० रुपयांचा दर मिळाला.

वांग्यांची २९० क्विंटलची आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ५०० ते २००० रुपये मिळाले. दोडक्यांची १४९ क्विंटलची आवक होऊन २००० ते २५००, वालाची ७६ क्विंटलची आवक होऊन २००० ते २५००, घेवड्याची १०३ क्विंटलची आवक होऊन १५०० ते २५००, डिंगरीची २५ क्विंटलची आवक होऊन २००० ते २५०० व बटाट्याची ४१२० क्विंटलची आवक होऊन १५०० ते २५०० रुपयांचा दर मिळाला. 

हिरव्या मिरचीची आवकही बऱ्यापैकी होत आहे. तिची २६७ क्विंटलची आवक होऊन १२०० ते २२००, शेवग्याची ८३ क्विंटलची आवक होऊन ३५०० ते ४००० रुपयांचा दर मिळाला. मेथी, पालक, कोथिंबीर, शेपू, कढीपत्ता यालाही चांगली मागणी राहिली. ओला हरभरा, मका कणसे, मुळा, चवळी, चुका, वाटाण्याचीही आवक होत आहे, असे बाजार समितीचे सचीव अभय भिसे यांनी सांगितले. 

तूर, ज्वारीची आवक सुरू 

बाजार समितीत भुसारमध्ये तूर, ज्वारीची आवक सुरू झाली आहे. ज्वारीला प्रतिक्विंटलला २३०४ ते ४१५०, बाजरीला १७५० ते २३५०, तुरीला ४२०३ ते ४६५१, हरभऱ्याला ३४०० ते ४१००, मुगाला ५१०० ते ७१००, उडदाला ४५०० ते ६०००, लाल मिरचीला ६७९० ते १४२८९, गव्हाला २५००, एरंडीला ३४००, गूळडागाला २९५० ते ३९००, मक्याला १९५०, सोयाबीनला ३००० ते ३९७५ रुपये दर मिळत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT