Green chillies, capsicum, cauliflower, brinjal are booming 
बाजारभाव बातम्या

हिरवी मिरची, शिमला मिरची, फ्लॉवर, वांगी तेजीत

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक काहीशी कमी प्रमाणात झाली मागणी वाढल्यामुळे हिरवी मिरची, शिमला मिरची, प्लॉवर, वांगी या फळभाज्यांच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे.

टीम अॅग्रोवन

पुणे : श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक काहीशी कमी प्रमाणात झाली मागणी वाढल्यामुळे हिरवी मिरची, शिमला मिरची, प्लॉवर, वांगी या फळभाज्यांच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. इतर सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

गुलटेकडी येथील बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २६) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ८० ते ९० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली. परराज्यातून मध्य प्रदेशमधून ४० ट्रक मटार, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश येथून १० ते १२ ट्रक हिरवी मिरची, राजस्थान येथून १४ ते १५ ट्रक गाजर, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसूण १० ते १२ ट्रक इतकी आवक झाली. स्थानिक भागातून सातारी आले १००० ते १२०० पोती, भेंडी ६ ते ७ टेम्पो, गवार ६ ते ७ टेम्पो, टोमॅटो ९ ते १० हजार क्रेट्स, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, सिमला मिरची ८ ते १० टेम्पो, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, कांदा १०० ट्रक, आग्रा, इंदूर आणि गुजरात व स्थानिक भागांतून बटाटा ४० ट्रक इतकी आवक झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.  फळभाज्यांचे दहा किलोचे भाव कांदा : नवीन -१००-३००, बटाटा : २५०-३२०, लसूण :१००-४००, आले सातारी : १००-२००, भेंडी : ६००-७००, गवार : गावरान व सुरती ६००-८००, टोमॅटो : १५०-२५०, दोडका : ३५०-४५०, हिरवी मिरची : ३००-४००, दुधी भोपळा : २००-३००, चवळी : ४००-५००, काकडी : २००-२५०, कारली : हिरवी ४००-५००, पांढरी : ३००-४००, पापडी : ५००-५५०, पडवळ : ३००-४००, फ्लॉवर : ३००- ४००, कोबी : २५०-३२०, वांगी : ८००-१०००, डिंगरी : ४००-५००, नवलकोल : १५०-२००, ढोबळी मिरची : ४००-७००, तोंडली : कळी ७००-७५०, जाड : ३००-४००, शेवगा : १२००-१३००, गाजर : १५०-२००, वालवर : ५००-५५०, बीट : ३००-३५०, घेवडा : ५००-५५०, कोहळा :१००-१५०, आर्वी: ३००-३५०, घोसावळे : ३००-३५०, ढेमसे : ३००-३५०, भुईमूग शेंग : ३५०-४५०, मटार : २५०-३४०, पावटा : ४००-४५०, तांबडा भोपळा :६०-१००, सुरण : १८०-२००, मका कणीस : ५०- १००, नारळ (शेकडा) : १०००-१६००. चिकू, पेरू, संत्रा, लिंबू, बोरांच्या दरात वाढ  सद्यःस्थितीत मार्गशीर्ष महिन्यांत उपवास केले जात असल्यामुळे फळांना मागणी वाढली आहे. त्यामुळे मार्केटयार्डात रविवारी (ता. २६) चिकू, पेरू, मोसंबी, संत्रा, लिंबू, बोरे आणि खरबुजाच्या भावात वाढ झाली आहे. सीताफळ आणि डाळिंबाच्या भावात घट झाली आहे. कलिंगड, पपई, अननस आणि सफरचंदाचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. कलिंगड चार ते पाच टेम्पो, खरबूज दोन ते तीन टेम्पो, अननस ६ ट्रक, मोसंबी ४० ते ५० टन, संत्री १० ते १२ टन, डाळींब २५ ते ३० टन, लिंबे अडीच ते तीन हजार गोणी, पेरू ७०० ते ८०० क्रेट, चिकू एक हजार बॉक्स, बोरे ५०० ते ५५० गोणी इतकी आवक झाली. खरबूज प्रति किलोस पाच रुपये, चिकू दहा किलोस पन्नास रुपये, पेरू क्रेटमागे १०० रुपये, मोसंबी, संत्रा आणि बोरांच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे तर लिंबे गोणीमागे १०० रुपयांनी वाढली आहेत मात्र सीताफळ आणि डाळिंबाच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी घट झाली आहे. फळांचे भाव पुढीलप्रमाणे  लिंबे (प्रति गोणी) : २५०-३५०, अननस (डझन) : ७०-२७०, डाळिंब (किलो) भगवा : ३०-१४०, आरक्ता : १०-५०, गणेश १०-३०, मोसंबी : (३ डझन) : १८०-४००, (४ डझन ) : १०० ते २५०, संत्रा : (१० किलो) : २००-७००, कलिंगड: २२-२५, खरबूज : ३०-३५, पपई : ८-१२, चिक्कू ( १० किलो) १००-५००, पेरू (२० किलो) : ४००-६००. शोभीवंत फुलांना मागणी लग्नसराई सुरू असल्यामुळे शोभीवंत फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटी एक-दोन दिवस फुलांना आणखी मागणी वाढेल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान सद्यःस्थितीत फुलांचे दर तेजीतच आहेत.  फुलांचे प्रति किलोचे दर पुढीलप्रमाणे  झेंडू : ७०-१००, गुलछडी : ४०-१००, ॲस्टर : जुडी ३०-४०, सुट्टा १००-१६०, कापरी : ७०-१००, शेवंती : ८०-१५०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : ४०-७०, गुलछडी काडी : ५०-१५०, डच गुलाब (२० नग) : १००-३००,  जरबेरा : ६०-१००, कार्नेशियन : १८०-२५०, शेवंती काडी २००-३००, लिलियम (१० काड्या) १०००-१२००, ऑॅर्चिड ४००-६००, ग्लॅडिओ (१० काड्या) : १००-१५०. पापलेट, सुरमई, हलव्याच्या दरात वाढ नाताळ तसेच नववर्षामुळे हॉटेल व्यावसायिकांकडून पापलेट, सुरमई, रावस, हलवा या मासळींना मागणी वाढल्याने दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली. मार्गशीर्ष महिन्यामुळे घरगुती ग्राहकांकडून मटण, मासळी, चिकन तसेच अंड्यांना मागणी कमी आहे.  गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (२६ डिसेंबर) खोल समुद्रातील मासळीची १८ ते २० टन, खाडीतील मासळी २०० ते ४०० किलो, नदीतील मासळी एक ते दोन टन तसेच आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळींची एकूण मिळून १५ ते २० टन आवक झाली. कोळंबी, ओले बोबिंल, बांगडा या मासळीची आवक वाढली आहे. हॉटेल व्यावसायिकांकडून सुरमई, पापलेट, रावस, हलवा या मासळीच्या मागणीत वाढ झाल्याने दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.  चिकन तसेच अंड्यांचे दर स्थिर असल्याचे चिकन व्यापारी रुपेश परदेशी यांनी सांगितले. मटणाला फारशी मागणी नसून, दर स्थिर असल्याचे मटण व्यापारी प्रभाकर कांबळे यांनी सांगितले. मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर मागणीत वाढ होईल, असे त्यांनी सांगितले.  खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) : पापलेट : कापरी : १५००-१६००, मोठे- १२००-१५०० मध्यम : ९००-१२००, लहान ७००-८५०, भिला : ४५०-६५०, हलवा : ५५०-६५०, सुरमई : ४००-६५०, रावस : लहान ४५०-६५०, मोठा : ७५०-८५०, घोळ : ५५०-६५०, करली : २००-२८०, पाला : ७००-१५००, वाम : ४००-७००, करंदी-१६०-२८०, ओले बोंबील : १४०-२००, भिंग-३६०-४००. कोळंबी : लहान १८०-३६०, मोठी-४००-६००, जंबो प्रॉन्स : १४००-१६००, किंग प्रॉन्स : ७५०-८५०, लॉबस्टर : १५००-१७००, मोरी : २००-२८०, खेकडे : ३००-४५०. चिंबोऱ्या : ५००-७००, मांदेली-१००-१४०, राणीमासा-१६०-२००. खाडीची मासळी : सौंदाळे-२८०-३२०, खापी-२००-२८० नगली : १६०-४८०, तांबोशी : ३६०-४८०, पालू-२०० २८०, बांगडा : लहान-१००-१६०, बांगडा मोठा-१८०-२४०, शेवटे २००-२४०, तिसऱ्या-२४०, खुबे : १४०, लेपा-१२०-२४०, पेडवी-१००, वेळुंजी-१६०-२००, तारली-२००.  नदीतील मासळी : रहू-१६०-२००, कतला-१६०-२००, मरळ-४००-४८०, शिवडा-२००-२४०, खवली- २००-२४०, आम्ळी- ८०-१६०, खेकडे- २००-२८०, वाम-४८०-६००.  मटण- बोकडाचे ६८०, बोलाईचे- ६८० , खिमा-६८० , कलेजी-७२०. चिकन २००, लेगपीस-२५० , जिवंत कोंबडी-१५०, बोनलेस-३००.  अंडी : गावरान शेकडा ९३०, डझन १२०, प्रतिनगास १०. इंग्लिश शेकडा ५४०, डझन ७२, प्रतिनगास ६.००.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

Election Results Maharashtra 2024 : महाराष्ट्रावर महायुतीचेच राज्य

Pune Assembly Election Result : पुणे जिल्ह्यात महायुतीच !

Agricultural Challenges : सोयाबीन दराचा मुद्दा ठरला निष्प्रभ

Satara Assembly Constituency Result : सातारा जिल्ह्यात आठही जागांवर महायुतीचा करिष्मा

SCROLL FOR NEXT