Grain auction closed in Khandesh
Grain auction closed in Khandesh 
बाजारभाव बातम्या

खानदेशात धान्य लिलाव बंदच

टीम अॅग्रोवन

जळगाव : खानदेशात अनेक बाजार समित्यांमध्ये धान्य लिलाव बंदावस्थेत आहेत. मका, ज्वारी, बाजरी आदी धान्य अनेक शेतकऱ्यांकडे घरातच आहे. दुसरीकडे शासकीय खरेदी अपवाद वगळता सुरू झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. 

बाजरी, मका अधिकचा घरात साठविण्याची वेळ आली आहे. कारण, बाजार समित्यांमध्ये धान्याचे लिलाव बंद आहेत. जळगाव बाजार समितीमध्ये कोरोनाच्या भितीने अनेक अडतदार बाजारात येत नाहीत. त्यांचे काम बंदावस्थेत आहे. अशीच स्थिती चोपडा येथेही आहे. तर, धुळ्यातील शिरपूर, दोंडाईचा (ता.शिंदखेडा), नंदुरबारमधील शहादा व नंदुरबार बाजार समित्यांचे धान्य मार्केट यार्डही हव्या त्या क्षमतेने, गतीने कार्यरत नाही. 

पावसाळा तोंडावर असतानाच शेतकऱ्यांचे धान्य घरात पडून असल्याने शेतकऱ्यांची वित्तीय कोंडी झाली आहे. हाती पुरेसा पैसा नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेताची मशागत पूर्ण झालेली नाही. जळगाव बाजार समितीमध्ये लिलावच होत नाहीत. शेतकऱ्यांचा शेतमाल अडतदारांकडे पडून आहे. शारीरिक अंतर पाळून लिलाव सुरू करावे, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

Mango Season : आंबा विक्रीतून एक कोटी ६३ लाखांची कमाई

Climate Change : बदलत्या हवामानामुळे ‘ग्रीन नेट’ला मरगळ

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT