पोल्ट्री समालोचन
पोल्ट्री समालोचन  
बाजारभाव बातम्या

ब्रॉयलर्सच्या बाजारभावात २० टक्क्यांनी वाढ

दिपक चव्हाण

आठवडभरात ब्रॉयलर्सच्या बाजारात जोरदार तेजी दिसली असून, २० टक्क्यांनी दर वधारले आहेत. दुसरीकडे पुरवठा सुरळीत झाल्यामुळे अंड्यांचे दर चार टक्क्यांनी नरमले आहेत. श निवार (ता. १७) रोजी बेंचमार्क नाशिक विभागात ८० रु. प्रतिकिलोने ब्रॉयलर पक्ष्यांचे लिफ्टिंग झाले. आठ दिवसांत ६७ रु. वरून ८० रु.पर्यंत बाजार वधारला आहे. पुणे विभागात अंड्यांचे प्रतिशेकडा फार्म लिफ्टिंग बाजारभाव ४२१ वरून ४०५ रु.पर्यंत नरमले आहेत. नोव्हेंबर महिन्यात ब्रॉयलर पक्ष्यांचा बाजार मंदीत होता. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून बाजारात टप्प्याटप्प्याने सुधारणा होत गेली आहे. मार्गशीर्ष महिन्यात खप कमी होऊन बाजारभाव खाली जाण्याची धास्ती होती. मात्र, प्रत्यक्षात बाजाराने तेजी दाखवली आहे. पोल्ट्री फार्मर्स अॅंड ब्रीडर्स असोसिएशनचे (पीएफबीए) सचिव डॉ. पी. जी. पेडगावकर म्हणाले, की अपेक्षेप्रमाणे बाजाराने तेजीची चाल पकडली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी २५ ते ३१ डिसेंबरदरम्यान माल काढण्याचे नियोजिन केले आहे. सध्या मागणी चांगली असतानाही पुरवठा कमी प्रमाणात दिसत आहे. जर पक्ष्यांची वजने विक्रीयोग्य पातळीवर आली असतील, तर माल न रोखता त्याची विक्री करणे अधिक शहाणपणाचे ठरेल. सर्वांनीच ३१ डिसेंबरसाठी गर्दी करणे सयुक्तिक होणार नाही. नाशिक येथील पोल्ट्री उद्योजक अनिल फडके म्हणाले, की वातावरण वाढीसाठी अनुकूल असल्यामुळे सध्या मोठ्या पक्ष्यांची उपलब्धता अधिक दिसतेय. ओपन फार्मर्सकडील मालाची उपलब्धताही वाढली आहे. सध्याच्या जोरदार तेजीनंतर बाजारात थोडी नरमाई येऊ शकते. तथापि, मोठ्या खपाच्या इव्हेंट्समुळे एकूण बाजार किफायती राहील.  अंड्याचे दर उच्चांकी पातळीवरून १५० रु. प्रतिशेकडाने खाली आले आहेत. गेल्या महिनाभरात टप्प्याटप्प्याने बाजारभाव खाली आले आहेत. तथापि, ३ रु. प्रतिनग उत्पादन खर्चाच्या तुलनेत अंड्यांना किफायती बाजारभाव मिळाला असून, गेल्या काही वर्षांनंतर प्रथमच सरासरी उत्पादन खर्चापेक्षा विक्री दर मोठ्या फरकाने अधिक राहिला आहे. यामुळे लेअर पोल्ट्री उद्योगाच्या नफ्या चांगली वाढ झाली आहे. ब्रॉयलर्सचे बाजारभाव वधारल्यामुळे एका दिवसाच्या पिलांमधील तेजीलाही आधार मिळाला आहे. ४४ रु. प्रतिनग या उच्चांकी पातळीवर चिक्सचे दर स्थिरावले आहेत. हॅचिंग एग्जलादेखील ३३.५० रु. प्रतिनग असा उच्चांकी दर मिळत आहे. कच्चा माल स्वस्त असल्यामुळे सध्याचा पोल्ट्री फीडचा उत्पादन खर्च कमी असून, त्यातुलनेत ब्रॉयलर्सचा चांगला दर मिळत आहे. यामुळे चिक्स व हॅचिंग एग्जचे भाव तेजीत राहत आहेत. तथापि, चिक्स उच्चांकी पातळीवर असल्याने ओपन फार्मर्सचा एकूण उत्पादन खर्च वाढला आहे.   

प्रकार     भाव     परिमाण     बाजारपेठ
ब्रॉयलर     ८०     प्रतिकिलो     नाशिक
अंडी     ४०५     प्रतिशेकडा     पुणे
चिक्स     ४४     प्रतिनग     पुणे
हॅचिंग एग्ज  ३३.५०     प्रतिनग     मुंबई
मका     १२८०     प्रतिक्विंटल     सांगली
सोयामिल     २३,१००     प्रतिटन     इंदूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Market : कोट्यापेक्षा जादा साखर विक्री कारखान्यांना पडली महागात

Weather Update : सूर्य तळपल्याने होरपळ वाढली

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

SCROLL FOR NEXT