वांगी
वांगी  
बाजारभाव बातम्या

साताऱ्यात वांगी, मेथी, कोथिंबीर तेजीत

टीम अॅग्रोवन

सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.२४) वांगी, वाटाणा, मेथी, कोथिंबीर तेजीत असून हिरवी मिरची, पावटा, गवारीच्या आवकेत वाढ झाली आहे. वाटाण्याची २२ क्विंटल आवक झाली असून दहा किलो वाटाण्यास २५० ते ३०० रुपये दर मिळाला आहे. वाटाण्यास गुरुवारच्या (ता.१८) तुलनेत दहा किलो मागे शंभर रुपयांची दरवाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. वांग्याची तीन क्विंटल आवक झाली असून दहा किलो वांग्यास १०० ते २०० रुपये दर मिळाला. दोडक्‍याची चार क्विंटल आवक झाली असून दहा किलो दोडक्‍यास ३०० ते ३५० रुपये दर मिळाला. भेंडीची पाच क्विंटल आवक होऊन दहा किलो भेंडीस ३०० ते ४०० रुपये दर मिळाला. ढोबळी मिरचीची नऊ क्विंटल आवक झाली. दहा किलो ढोबळीस २०० ते ३०० रुपये दर मिळाला. शेवग्याची तीन क्विंटल आवक झाली, दहा किलो शेवग्यास ३०० ते ३५० रुपये दर मिळाला. काळा घेवड्याची सहा क्विंटल आवक होऊन दहा किलोस ३०० ते ३५० रुपये दर मिळाला. कारल्याची तीन क्विंटल आवक तर दहा किलोस ३०० ते ३५० रुपये दर मिळाला. टोमॅटोची २४ क्विंटल आवक होऊन दहा किलोस ५० ते ७० रुपये दर मिळाला. हिरवी मिरची, पावटा, गवारीच्या आवकेत वाढ झाली होती. हिरव्या मिरचीची १६ क्विंटल आवक झाली असून दहा किलोस १५० ते २२० रुपये दर मिळाला. पावट्याची तीन क्विंटल आवक होऊन दहा किलोस ३०० ते ४०० रुपये दर मिळाला. गवारीची दोन क्विंटल आवक तर दहा किलोस ४०० ते ५०० रुपये दर मिळाला. मेथीची २२०० जुड्यांची आवक होऊन शेकड्यास ५०० ते ६०० रुपये दर मिळाला. कोथिंबीरीची २५०० जुड्याची आवक झाली होऊन शेकड्यास ६०० ते ७०० रुपये दर मिळाला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chilli Cultivation : धाड परिसरात शेकडो हेक्टरवर यंदा झाली मिरचीची लागवड

Jharkhand Rain Update : झारखंडमध्ये अवकाळीचा कहर; वीज पडून पाच तर झाड कोसळून दोघांचा मृत्यू 

Water Agitation : हंडा घेऊन महिला धडकल्या सिंचन विभागाच्या कार्यालयावर

Loksabha Election 2024 : धाराशिवमध्ये मोठी चुरस

Liger Pesticide : ‘जीएसपी’चे कीटकनाशक ‘लायगर’ बाजारात

SCROLL FOR NEXT