Banana prices under pressure again in Khandesh
Banana prices under pressure again in Khandesh 
बाजारभाव बातम्या

खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात

टीम अॅग्रोवन

जळगाव : खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात आले आहेत. उत्तरेकडून कमी झालेली मागणी व लॉकडाऊन, कोरोनाची भिती, यामुळे दरात चढउतार सुरू आहेत. प्रतिक्विंटल २५० ते ५०० रुपयांपर्यंतचे दर आहेत. 

सध्या जळगाव जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनर, यावल, जळगाव, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील तळोदा, शहादा, अक्कलकुवा भागात केळीची काढणी सुरू आहे. उतिसंवर्धित रोपांच्या केळी बागांची लागवड रावेर, यावल, शिरपूर, शहादा भागात अधिक झाली होती. या भागात दर्जेदार केळीचे उत्पादन येत आहे. तर, इतर भागातही चांगले व्यवस्थापन करून दर्जेदार केळीचे उत्पादन शेतकरी घेत आहेत. परंतु, केळी दर २०१५-१६ नंतर नीचांकी पातळीवर प्रथमच पोचले आहेत. 

मध्यंतरी रमजानमुळे उत्तरेकडे केळीची चांगली मागणी होती. एकट्या रावेरातून रोज १८० ते १८५ ट्रक (एक ट्रक १५ मेट्रिक टन क्षमता) केळीची पाठवणूक उत्तरेकडे सुरू होती. तसेच मुक्ताईनगर, यावल भागातील केळीची खरेदी मध्यप्रदेशातील एजंटदेखील करीत होते. परंतु, रमजान महिना जसा अंतिम टप्प्यात पोचला, तशी केळीची मागणी कमी होत गेली. आवक स्थिर आहे. सध्या रावेर, यावल, मुक्ताईनगर भागात मिळून रोज २६० ट्रक तर धुळ्यातील शिरपूर, नंदुरबार जिल्ह्यात मिळून रोज ६० ते ६५ ट्रक केळीची काढणी सुरू आहे. अर्थातच खानदेशात रोज किमान ३२० ते ३३५ ट्रक केळीची आवक सुरू आहे.  ‘पणन’चा गोंधळ कायम 

केळीला सर्वाधिक मागणी उत्तर भारतात असते. तसेच राज्यात नागपूर, पुणे, मुंबई, छत्तीसगड येथेही केळीची पाठवणूक केली जाते. राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेला पणन व्यवस्थेचा गोंधळ कायम आहे. अनेक ग्राहक भितीमुळे केळीची खरेदी टाळत आहेत. तर, पुणे, मुंबईमध्ये बाजार विस्कळीत झाले आहेत. परिणामी, राज्यात केळीची हवी तशी मागणी नाही, अशी माहिती केळी व्यापारातील जाणकार सुधाकर चव्हाण यांनी दिली.     

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT