The average price of onion in Solapur is Rs 2100
The average price of onion in Solapur is Rs 2100 
बाजारभाव बातम्या

सोलापुरात कांद्याला सरासरी २१०० रुपये

टीम अॅग्रोवन

सोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवारी (ता.२२) कांद्याला प्रतिक्विंटलला किमान १०० रूपये आणि सरासरी २१०० रूपये, तर कमाल ५०५० रूपये दर मिळाला. कांदा निर्यात बंदीच्या निर्णयानंतर दर उतरतील, अशी शक्‍यता होती. पण, उलट दर सुधारले आहेत.

दुसरीकडे करमाळ्यात उडदाची विक्रमी आवक होऊनही उडदाला सर्वाधिक ८ हजार ४०१ रूपये दर मिळाला. या दोन्ही बाजार समितीतील कांदा आणि उडदाच्या दरातील उसळीमुळे शेतकऱ्यांना काहिसा दिलासा मिळाला. 

गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवकेत काहिशी घट होत आहे. पण, मागणी असल्याने दरात चढ-उतार आहे. सोलापूर बाजार समितीच्या आवारात मंगळवारी १७ हजार २४० क्विंटल इतकी कांद्याची आवक झाली. जिल्ह्यासह नजीकच्या सांगली, पुणे, नगर, उस्मानाबाद भागातून कांद्याची आवक आहे. गेल्या काही दिवसांपासून आवक तशी जेमतेमच आहे. पण, मागणीत सातत्य असल्याने दर काहिसे वधारले. मंगळवारी आवक वाढूनही कांद्याला कमाल दर ५०५० रुपयांपर्यंत होता.  येत्या काही दिवसांत दर आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. 

उडदाच्या दरात सुधारणा

मंगळवारी करमाळ्यात उडदाचा दर सर्वाधिक ८ हजार ४०१ रुपयांवर पोचला. तर किमान ५ हजार ७००, सरासरी ७ हजार ७०० इतका दर राहिला. कांदा आणि उडदाच्या या दरातील सुधारणेमुळे शेतकऱ्यांना तूर्त तरी दिलासा मिळाला आहे. 

आवक कमी, मागणी जास्त

दरम्यान, दुसरीकडे करमाळा बाजार समितीमध्येही गेल्या पंधरा दिवसात उडदाची रोज १० हजार गोण्या आवक होत होती. त्यामुळे दिवसाआड लिलाव घ्यावे लागत होते. त्याचा दरही साडेपाच हजाराच्या आत होता.  मात्र, गेल्या चार दिवसांपासून उडदाची आवक कमी होत आहे. त्यामुळे इथेही आवक कमी आणि मागणी जास्त अशी तफावत झाल्याने दर वधारले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT