In Aurangabad, chillies, cabbage, Fluctuations in the arrival of okra and eggplant
In Aurangabad, chillies, cabbage, Fluctuations in the arrival of okra and eggplant 
बाजारभाव बातम्या

औरंगाबादमध्ये ढोबळी मिरची, कोबी, भेंडी, वांग्यांच्या आवकेत चढ-उतार

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद:  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आठवडाभरात ढोबळी मिरची, कोबी, फ्लॉवर, भेंडी, वांग्यांच्या आवकेत चढ-उतार राहिला. दुसरीकडे या सर्व भाज्यांच्या दरात मात्र बहुअंशी स्थिरता पाहायला मिळाली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये २९ जून ते ४ जुलै दरम्यान ढोबळ्या मिरचीची जवळपास ५९ मिनिटाला आवक झाली. ७ ते २१ क्विंटल दरम्यान आवक झालेल्या या ढोबळ्या मिरचीचे दर १ हजार ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान राहिले. आठवड्यापूर्वी २७ जून रोजी बाजार समितीत ढोबळ्या मिरचीची आवक ४४ क्‍विंटल, तर दर १००० ते २८०० रुपये प्रतिक्विंटल होते. 

कोबीची जवळपास २४३ क्विंटल आवक झाली. ३४ ते  ६७ क्विंटल दरम्यान आवक झालेल्या कोबीला ३०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला. २७ जून रोजी बाजार समितीत कोबीची १३० क्विंटल आवक झाली. तर दर ४०० ते ६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. फ्लॉवरची आवक आठवडाभरात जवळपास १६९ क्विंटल झाली. तर, दर सातशे ते २५०० रुपये प्रतिक्विंटल दर राहिला. गत आठवडाभरात २३ ते ४८ क्विंटल दरम्यान आवक झाली. फ्लॉवरची २७ जून रोजी ४७ क्विंटल आवक झाली. तर, दर १००० ते २८०० रुपये प्रतिक्विंटल होता. 

भेंडीची आठवडाभरात जवळपास १३४ क्विंटल आवक झाली. तिला ७०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. १३ ते ३७ क्विंटल दरम्यान आवक झालेल्या या भेंडीला ७०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. २७ जून रोजी ६५ क्‍विंटल आवक झाली. त्या वेळी ८०० ते १००० रुपये दर मिळाला.

वांग्यांची आठवडाभरात जवळपास १६० क्विंटल झाली, तर दर ६०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. वांग्यांची १४ ते ६४ क्विंटल दरम्यान आवक झाली. आठवडाभरापूर्वी २७ जून रोजी ४५ क्विंटल आवक झालेल्या वांग्यांना १००० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT