मुग
मुग 
बाजारभाव बातम्या

अकोल्यात मुगाला प्रतिक्विंटल ४२५५ ते ५२०० रुपये

Gopal Hage

अकोला ः मुगाच्या काढणीचा हंगाम सुरू झाला असल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुगाच्या अावकेत वाढ झाली अाहे. मंगळवारी (ता. १२) बाजारात मुगाला ४२५५ ते ५२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मुगाची १२१० क्विंटल अावक झाली होती. सध्या वऱ्हाडात मुगाची काढणी मध्यावर अाली अाहे. काढणी झालेल्या मुगाची मोठ्या प्रमाणात अकोला बाजारात अावक होत असते. सध्या काढणी झालेला नवीन मूग थेट बाजारात दाखल होत अाहे. बाजारात उडदाचीही अावक सुधारली अाहे. उडदाची ५१५ क्विंटल अावक होती. उडदाला ४००० ते ५००० व सरासरी ४५०० रुपये प्रतिक्विंटल दर होता. हरभऱ्याच्या दरात सुधारणा दिसून येत अाहे. हरभऱ्याला ४०५० ते ५९५० व सरासरी ३९५० रुपये प्रतिक्विंटल दर होता. हरभऱ्याची ३९५ क्विंटल अावक होती. तुरीची ६५६ क्विंटल अावक झाली होती. तूर ४०६० ते ४२७५ रुपये दराने विकली. सोयाबीनची अावक ५०० क्विटंलपेक्षा अधिक होत अाहे. सोयाबीनला २५२५ ते २९२५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.  हमीभावापेक्षा कमी दर बाजारात विक्रीला येत असलेल्या मुगाला पाच हजारांपेक्षा कमी दर मिळत अाहे. वास्तविक शासनाने मुगाचा हमीभाव ५३७५ जाहीर केला असून, त्यावर २०० रुपये बोनसही जाहीर केले अाहे. त्यामुळे हा दर ५५७५ रुपये होतो. पण एवढा दर कुठेच मिळताना दिसत नाही. उडदाचीही अशीच स्थीती अाहे. उडदाला ५२०० रुपये हमीभाव, २०० रुपये बोनस असा मिळून ५४०० रुपये दर शासनाने जाहीर केलेला अाहे; परंतु उडीदसुद्धा ४००० ते ५००० या दरम्यान विक्री होत अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

Agrowon Podcast : कापूस भाव स्थिरावले ; कापूस, सोयाबीन, तूर, तसेच आल्याचा काय आहे दर ?

Animal Treatment : दररोज ३०-४० जनावरांवर उपचार बंधनकारक

Kharif Season : खरिपात वाढणार सोयाबीन, कपाशी क्षेत्र

SCROLL FOR NEXT